बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. तिने तिच्या डान्सच्या अदांनी अनेकांना घायाळ केले आहे. तिने चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता सध्या सोशल मीडियावर माधुरीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती इमरान हाश्मीसोबत डान्स करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डान्स स्वॅग’ या इन्स्टाग्राम अकाऊंटने माधुरी दीक्षित आणि इमरान हाश्मीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे ‘पी लूं’ (Pee Loon Song) या गाण्यावर रोमँटीक अंदाजात डान्स करताना दिसत आहे. त्या दोघांचा हा जूना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

माधुरी आणि इमरानचा रोमँटीक डान्सपासून करण जोहर देखील आश्चर्यचकित झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. माधुरी आणि इमरानने अद्याप कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केले नाही. पण या व्हिडीओमधील त्या दोघांचा डान्स पाहण्यासारखा आहे. हा व्हिडीओ जवळपास १३ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तसेच चाहत्यांनी या फोटोवर कमेंट देखील केल्या आहेत.

सध्या माधुरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सतत फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिचा कलंक आणि टोटल धमाल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तसेच तिने डांस दीवाने या शोमध्ये परिक्षक म्हणून काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit dance with emraan hashmi on pee loon song avb
First published on: 31-10-2020 at 18:19 IST