प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या दरम्यान व्हायरल झालेल्या मोनालिसा या तरुणीचा चित्रपट लवकरच येतो आहे. प्रयागराज या ठिकाणी माळ विक्री करणाऱ्या मोनालिसाचं मूळ नाव मोनी भोसले असं आहे. तिचं सौंदर्य पाहून तिच्या सौंदर्याची भुरळ अनेकांना पडली होती. मोनालिसा ही मूळची इंदूर येथील आहे. महाकुंभमेळ्यात तिच्या लूकमुळे तिची चर्चा देशभरात झाली होती. याच मोनालिसाला चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. तिचा चित्रपट आता लवकरच येतो आहे. मोनालिसा मल्याळम चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करते आहे.
कुठल्या चित्रपटात झळकणार मोनालिसा?
मोनालिसा नागम्मा या मल्याळम चित्रपटात झळकणार आहे. कैलाश या अभिनेत्यासह झळकणार आहे. पी. बिनू वर्गिस यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर जिली जॉर्ज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नागम्मा या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होऊन ते सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत संपणार असल्याची चिन्हं आहेत. या मल्याळम चित्रपटासंदर्भात जी पूजा करण्यात आली त्याचे फोटो मोनालिसा अर्थात मोनी भोसलेने पोस्ट केले आहेत.
कोण आहे मोनिलासा?
मोनिलासाचा एक व्हिडीओ जानेवारी महिन्यात चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे कुंभमेळ्यात तिचीही चर्चा रंगली. मोनालिसाचं सौंदर्य खरोखरच अप्रतिम आहे. मात्र तिच्यासह फोटो काढण्यासाठी, व्हिडीओसाठी, तिच्याशी बातचीत करण्यासाठी अक्षरशः त्रास दिला जातो आहोत. मोनालिसा माळा विक्रीचं काम करते पण तिच्या या व्यवसायावरही या सगळ्यामुळे परिणाम झाला आहे. प्रयागराजमध्ये गेल्यानंतर तिला प्रसिद्धी मिळाली. पण या प्रसिद्धीचा परिणाम तिच्या पोटापाण्याच्या व्यवसायावर होतो आहे. लोक तिला पाहिलं की तिच्या मागे लागतात. तिला त्रास देतात. त्यामुळे तिची माळा विक्री राहूनच जाते. असं मोनालिसाच्या आजोबांनी सांगितलं. तिच्या सौंदर्याची भुरळ अनेकांना पडली आहे. मोनालिसा अवघ्या १६ वर्षांची आहे. तिला जी प्रसिद्धी मिळाली त्यापेक्षाही तिला उदरनिर्वाहासाठी जो व्यवसाय ती करते तो अधिक महत्त्वाचा वाटतो तिने काही दिवसांपूर्वी हे माध्यमांनाही सांगितलं आहे.
मोनालिसाचं खरं नाव मोना भोसले
मोनालिसाचं खरं नाव मोना भोसले असं आहे. ती इंदूरची आहे. तिच्या सौंदर्याची तुलना मोनालिसाच्या सौंदर्याशी केली गेल्याने तिला कुंभमेळ्यातली मोनालिसा असं म्हटलं गेलं आहे. आता तिला एक मल्याळम चित्रपट मिळाला आहे. याआधी तिला एक हिंदी चित्रपटही मिळाला होता पण तो पूर्ण होऊ शकला नाही. आता या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होणार आहे आणि मल्याळम चित्रपटातून मोनालिसा पदार्पण करणार आहे.