अभिनेता अंकुश चौधरीसाठी यंदाचे वर्ष खूप खास ठरले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? २०१५ मध्ये अंकुश चौधरी महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता आणि स्टाईल आयकॉन या दोन्ही पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे.
महाराष्ट्राची लोकधारा आणि एकांकिकांमधून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अंकुशने २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या क्लासमेट्स, डबल सीट आणि दगडी चाळ या सुपर हिट चित्रपाटत आपल्या उत्कृष्ट अभिनयाने रसिकांचे मन जिंकले. हे तीन हि चित्रपट अंकुशच्या अभिनयी कारकिर्दीला यशाच्या शिखरावर नेणारे ठरले. क्लासमेट्स मधील सत्या, डबल सीट मधील अमित आणि दगडी चाळ मधील सूर्या या तीनही व्यक्तिरेखा प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या आहेत आणि म्हणूनच प्रेक्षकांनी आपल्या लाडक्या अंकुशला या वर्षीच्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१५ मध्ये महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता आणि स्टाईल आयकॉन म्हणून निवडले.  प्रेक्षक व समीक्षकांनी केलेलं कौतुक आणि अभिनयातील कुशलपणा यामुळे अंकुशने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपले एक घट्ट स्थान निर्माण केलेलं आहे. लागोपाठ ३ सुपर हिट चित्रपट, दगडी चाळने बॉक्स ऑफिसवर  केलेली धूम आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं प्रेम यामुळे अंकुशसाठी २०१५ वर्ष खूप खास ठरले.
सध्या अंकुश, संजय जाधव दिग्दर्शित गुरु चित्रपटाच्या चीत्रीकरणात व्यस्त आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गुरु’च्या टीझर वरून या चित्रपटात अंकुश वेगळ्या अंदाजात दिसून येणार आहे.
  संग्रहित लेख, दिनांक 3rd Dec 2015 रोजी प्रकाशित  
 अभिनेता अंकुश चौधरी ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता
अभिनेता अंकुश चौधरीसाठी यंदाचे वर्ष खूप खास ठरले आहे.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
 
  First published on:  03-12-2015 at 16:26 IST  
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtracha favourite kon 2015 ankush chaudhari wins two best awards