‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या विनोदी कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रसिद्धी झोतात आले. त्यापैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar). ‘पुण्याची विनम्र अभिनेत्री’ अशी ओळख निर्माण करत तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. प्रियदर्शिनीच्या अभिनयाबरोबरच तिच्या निरागस सौंदर्याचेही तितकेच चाहते आहेत. प्रियदर्शिनीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अनेक विनोदी स्किट्स सादर केले आहेत. शिवाय तिने काही चित्रपटांमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.

प्रियदर्शिनी सध्या ‘विषामृत’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नाटकानिमित्त तिचे महाराष्ट्रात दौरे होत असतात. यावेळी अनेक किस्से घडत असतात. या नाटकादरम्यानचा असाच एक खास किस्सा तिने शेअर केला आहे. प्रियदर्शिनीने नुकतीच ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’ सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी तिने हा खास किस्सा शेअर केला आहे. याबद्दल प्रियदर्शिनी असं म्हणाली की, “आमचा या नाटकाचा पहिल्यांदा चिपळूणला दौरा होता आणि हे नाटक तसं बऱ्यापैकी शहरी आहे”.

यापुढे ती म्हणाली की, “शहरी जीवन आणि शहरी नवरा-बायकोच्या नात्याविषयी जरा बोल्ड वक्तव्य करणारं हे नाटक आहे. तर हसता हसता अचानक प्रेक्षकांना धक्का नको म्हणून आम्हाला भीती वाटत होती आणि त्याबाबत आम्ही जरा चिंताग्रस्त होतो. पण यानिमित्ताने विशेषत: चिपळूणच्या प्रेक्षकांचे कौतुक करावसं वाटतं की, त्यांनी आम्हाला असा प्रतिसाद दिला की आम्ही जे जे ऐकतो ते तुम्ही आम्हाला दाखवलं”.

यापुढे अभिनेत्री असं म्हणाली की, “आम्हाला इथे बसल्या बसल्या तुम्ही त्या शहराची सैर घडवून आणलीत. तिकडे लोक कसे जगत आहेत आणि लोकांनी एकमेकांना कशात गुरफटवून घेतलं आहे. हा अत्यंत वेगळा दृष्टिकोन चिपळूणच्या प्रेक्षकांकडून मिळाला. त्यामुळे तो प्रयोग आणि त्या प्रतिक्रिया कायम लक्षात राहतील”.

View this post on Instagram

A post shared by Priyadarshini Indalkar (@shini_da_priya)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रियदर्शिनीच्या विषामृत नाटकाबद्दल बोलायचे झाले तर या नाटकात प्रियदर्शनीसह अभिनेता शुभंकर तावडे प्रमुख भूमिकेत आहे. तसंच अभिनेत्री आरती मोरे, चैताली सोपारकर-कोहली, शौनक रमेश हे कलाकारही नाटकात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.