‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही हा कार्यक्रम लोक आवडीने बघतात. हा कार्यक्रम म्हणजे टेन्शनवरचं उत्तम औषध आहे. या कार्यक्रमामधील कलाकार मंडळींचा चाहतावर्ग फारच मोठा आहे. याच कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेता समीर चौगुले. समीर यांच्या विनोदाचा अचूक टायमिंग, मंचावर साकारत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करतं. त्यांनी आजवर मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामधून काही दिवसांसाठी समीर यांनी ब्रेक घेतला असल्याचं सध्या दिसत आहे. समीर काही दिवस ब्रेक म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये फिरायला गेले आहेत. खरंतर ऑस्ट्रेलियाला जाण्यामागचं आणखी एक खास कारण आहे ते म्हणजे मेलबर्नमध्ये होणारा विश्वास सोहनी नाट्यमहोत्सव. या नाट्यमहोत्सवासाठीच समीर ऑस्ट्रेलियाला गेला आहे. आनंद इंगळे, अंकुश चौधरी, निर्मिती सावंत यांसारख्या मंडळींनी या नाट्यमहोत्सवाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Afghanistan Cricketer rashid khan
क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनता आनंदी – रशीद खान
Kevin Pietersen Shares Experience of flight while Iran Attacks Israel
IPL 2024: इराणच्या इस्रायलवरील हल्ल्याबाबत केविन पीटरसनची पोस्ट चर्चेत; अनुभव मांडताना म्हणाला, “त्यांची क्षेपणास्त्रं चुकवण्यासाठी…”
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
chennai super kings vs kolkata knight riders match preview
IPL 2024 : विजयी पुनरागमनासाठी चेन्नई सुपर किंग्ज उत्सुक! आज अपराजित कोलकाताचे आव्हान; कर्णधारांच्या कामगिरीकडे लक्ष 

आणखी वाचा : “मी लेडी रणवीर सिंग” मॉडेल, अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा विचित्र वक्तव्यामुळे चर्चेत

नुकताचा समीर यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मेलबर्नमध्ये सुरू असणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामना बघण्यासाठी समीर तिथे गेले आहेत. तिथल्या स्टेडियममध्ये समीर यांनी लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. याबरोबरच हा आयुष्यातील पहिला लाईव्ह क्रिकेट सामना बघत असल्याचंही समीर यांनी या व्हिडिओत नमूद केलं आहे.

स्टेडियममधील वातावरण पाहून समीर चांगलेच भारावून गेल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. समीर यांच्या या सोशल मीडियावरील अपडेट्सना त्यांचे चाहते उत्स्फूर्त प्रतिसाद देत असतात. लवकरच ऑस्ट्रेलियामधील ही टुर संपवून समीर लवकरच हास्यजत्रेच्या चित्रीकरणाला सुरुवात करतील.