कलाकारांना आपल्या व्यग्र वेळापत्रकामधून निवांत वेळ मिळणं फारच कठीण असतं. बऱ्याचदा तर कुटुंबाला देखील वेळ देता येत नाही. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गाजवणारी अभिनेत्री नम्रता संभेरावला देखील या प्रसंगाचा सामना करावा लागला. नम्रता ही एक उत्तम अभिनेत्री तर आहेच. पण त्याचबरोबरीने ती एक उत्तम पत्नी आणि आई देखील आहे. नम्रता गरोदरपणानंतर काही दिवसांनी पुन्हा कामावर परतली. पण यादरम्यानचा काळ तिच्यासाठी कसा होता हे तिने शेअर केलं आहे.

आणखी वाचा – मराठीमधील सगळ्यात बोल्ड चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच, ‘टकाटक २’मध्ये काय पाहायला मिळणार?

नम्रताला रुद्राज नावाचा गोंडस मुलगा आहे. ती रुद्राजबरोबरचे फोटो तसेच त्याचे व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. आता देखील तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये आई म्हणून तिला नेमकं काय वाटतं?, गरोदरपणानंतर चित्रीकरणामध्ये व्यग्र असताना नम्रताला कोणती भीती सतावत होती? हे तिने सांगितलं आहे.

नम्रताने रुद्राजबरोबरचा फोटो शेअर करत म्हटलं की, “मला एक गोष्ट शेअर करावीशी वाटते. आणि ही गोष्ट सगळ्या आयांची आहे असं मला वाटतं. रुद्राजच्या जन्मानंतर जेव्हा मी चित्रीकरणासाठी बाहेर पडायचे तेव्हा माझ्या मनात अपराधीपणाची भावना यायची. माझ्या बाळाला मला वेळ देता येत नाही, तो मला जीव लावेल ना…सतत आई आई म्हणत माझ्या अवतीभोवती फिरेल ना…असे असंख्य प्रश्न मनात असायचे.”

आणखी वाचा – Photos : विशाळगडाच्या पायथ्याशी ‘पावनखिंड’मधील अभिनेत्याने बांधलं घर, पाहा फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता नम्रताचा मुलगा तिला आई म्हणून हाक मारतो तेव्हा नेमकं तिला काय वाटतं हे देखील अभिनेत्रीने सांगितलं आहे. कलाकारांच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग घडत असतात. नम्रताने देखील या गोष्टींचा अनुभव घेतला. पण आता ती तिच्या मुलाला मिळालेल्या वेळेमध्ये खूश ठेवण्याचा प्रयत्न करते. एकूणच काय तर घर आणि काम अशा सगळ्या जबाबदाऱ्या नम्रता उत्तमरित्या सांभाळते.