‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गाजवणारी अभिनेत्री नम्रता संभेराव सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. ती सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवताना दिसते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळेच तिला अधिक लोकप्रियता मिळाली. तिच्या विनोदी शैलीचे हजारो चाहते आहेत. एक कलाकार म्हणून नम्रता उत्तम आहेच. पण त्याचबरोबरीने खऱ्या आयुष्यात एक पत्नी, मुलगी, आई आणि मैत्रीण म्हणून ती उत्तम भूमिका निभावते. आता देखील नम्रताने तिच्या जवळच्या मैत्रिणीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – “मला आई पाहिजे असं तो म्हणतो तेव्हा…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ गाजवणाऱ्या नम्रता संभेरावची लेकासाठी भावूक पोस्ट

नम्रता आपल्या मित्र परिवाराबरोबर इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे फोटो शेअर करताना दिसते. त्यातीलच तिची एक जवळची मैत्रिण म्हणजे अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर. रसिका कॉलेजच्या दिवसांपासून नम्रताबरोबर आहे. त्याचबरोबरीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये दोघी काम करतात. रसिकाच्या वाढदिवसानिमित्त नम्रताने खास पोस्ट शेअर केली आहे.

यामध्ये नम्रताने म्हटलं की, “महर्षी दयानंद महाविद्यालय ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या १५ वर्षांच्या प्रवासात आपण एकत्र आहोत. अजूनही शिकतोय, धडपडतोय, चाचपडतोय. पण या सगळ्यात तुझी वाटचाल यशाच्या दिशेने होतेय हे पाहून अत्यानंद होतो. अशीच खूप पुढे जा मोठी हो. तुझी सगळी स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहेत. खूप प्रेम रसिका.” नम्रताने रसिकाबरोबरचा फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – राणादा-पाठकबाईंची लग्नापूर्वी लंडन ट्रिप, प्रेमात आकंठ बुडालेल्या सेलिब्रिटी कपलची चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नम्रताचा मित्र-परिवार मोठा आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमबरोबर देखील ती फोटो शेअर करताना दिसते. आता लवकरच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येईल. म्हणजेच पुन्हा एकदा विनोदाचा डबल डोस रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.