‘RRR’ चित्रपटामुळे दिग्दर्शक एस एस राजामौली हे नाव आत जगाला परिचयाचे झाले आहे. त्यांच्या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ओरिजनल साँगचा अवॉर्ड जिंकला. प्रख्यात दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. जगभरातील दिग्गज कलाकार मंडळीसुद्धा या चित्रपटाच्या प्रेमात पडली आहेत. खुद्द राजामौलीसुद्धा या चित्रपटाच्या ऑस्करवारीसाठी सज्ज आहेत आणि प्रचंड उत्सुक आहेत. राजामौली एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहेतच, आता त्यांची तुलना मराठीतले दिग्गज दिग्दर्शक महेश कोठारेंशी केली जात आहे.
मराठी सिनेसृष्टीतील धडाकेबाज सुपरस्टार अशी ख्याती असणारे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांचा जीवनप्रवास पुस्तकरूपात रसिकांच्या भेटीला आला आहे. महेश कोठारे यांच्या यशा-अपयशाची गाथा ‘डॅम ईट आणि बरंच काही’ या पुस्तकातून सांगितली गेली आहे. या पुस्तक प्रकाशनानंतर त्यांनी फ्री प्रेसच्या जर्नलला दिलेल्या मुलाखतीत या तुलनेवर भाष्य केले आहे.
निळू फुलेंच्या बायोपिकच्या तयारीला लागला प्रसाद ओक; म्हणाला, “या चित्रपटाची…”
महेश कोठारेंना विचारण्यात आले की, दिग्दर्शक एसएस राजामौली हे काल्पनिक चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात, त्यांची तुलना तुमच्याशी केली तर आवडेल का? त्यावर महेश कोठारे म्हणाले, “राजामौली हे इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. त्यांच्याशी माझी तुलना केली तर मला हा सन्मान वाटेल, पण त्यांनी चित्रपट बनवायला सुरुवात करण्यापूर्वी मी काल्पनिक चित्रपट बनवत होतो. मी १९८७ मध्ये ‘दे दणा दण’ नावाचा चित्रपट केला होता जो काल्पनिक होता. मी त्यांचा ‘ईगा’ हा चित्रपट मराठीत बनवण्याचा विचार करत होतो.” अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
“…म्हणून मी हिंदी चित्रपट”; निर्मात्यांच्या ‘त्या’ भूमिकेवर चिन्मय मांडलेकरने व्यक्त केली खंत
महेश कोठारे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात बालकलाकार म्हणून केली. त्यांचे आई वडीलदेखील नाट्यसृष्टीत कार्यरत होते. आता त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे अभिनयात तसेच निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. महेश कोठारे यांनी ‘धुमधडाका’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले.