झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेतील मायरा म्हणजेच परी या चिमुकलीने सर्वांचीच मन जिंकली आहेत. मायरासोबत या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांमुळे मालिकेला चार चांद लागले आहेत. पण या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेत परीची आई नेहा कामत ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने मालिकेतून ब्रेक घेतल्याचे बोललं जात आहे. नुकतंच याबाबतची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या मालिकेत ‘नेहा’ म्हणजे प्रार्थना ही कामानिमित्त लंडनला जात असल्याचे दाखवले जात आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस ती या मालिकेत दिसणार नाही. प्रार्थनाने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केल्यामुळे तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. मात्र प्रार्थनाने नुकतंच या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे आता मालिकेच्या पुढील काही भागात ती दिसणार नाही. यामुळे तिचे चाहते नाराजी व्यक्त करत आहे.

Video : “आमच्या दोघांचा…”, राणादासोबत साखरपुडा झाल्यानंतर पाठकबाईंची खास पोस्ट

नुकतंच प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती खऱ्या आयुष्यात लंडनला गेली आहे. प्रार्थना ही तिच्या पतीसोबत सध्या लंडनवारी करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने हटके कॅप्शनही दिले आहे.

“माझ्यात आणि दिघे साहेबांमध्ये…”, अभिनेता सलमान खानची ‘धर्मवीर’ चित्रपटाबद्दल पहिली प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यासोबत तिने या व्हिडीओत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला टॅग करत ‘आम्ही लवकरच येतोय’ असं म्हटल आहे. दरम्यान सध्या सोनाली कुलकर्णी ही लंडनमध्ये आहे. सोनाली ही पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकण्याची तयारी करत आहे. सोनालीने लॉकडाऊनमध्ये लग्न केले होते. त्यामुळे तिच्या लग्नाला कोणालीही उपस्थितीत राहता आले नव्हते. त्यामुळेच ती पुन्हा एकदा सर्वांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात लग्न करणार आहे. या लग्नसोहळ्यासाठीच प्रार्थना लंडनला गेली असल्याचा अंदाज अनेक चाहत्यांनी लावला आहे.