आज १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. अनेकजण त्यांच्या प्रेमाची कबुली देतात. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी देखील व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या प्रेमामी कबुली दिली आहे. काहींनी याच दिवशी लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. व्हॅलेंटाइन डे साजरा करताना बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या पार्टनरसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यात आता बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री ट्विंकल खन्नाने मलायकाच्या या पोस्टवर कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मलायकाने व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अर्जुनसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, ‘तू माझा आहेस’ असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान मलायकाने पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केल्याचे दिसत आहे. तर अर्जुनने रंगाचं टी-शर्ट आणि राखाडी रंगाची ट्रॅक पँट घातली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaika arora brands arjun kapoor mine on valentines day post twinkle khanna reacts avb
First published on: 14-02-2022 at 16:42 IST