बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत राहते. मलायका अभिनयासोबत उत्तम डान्स देखील करते. आतापर्यंत तिने बऱ्याच डान्स रिअलिटी शोसाठी परीक्षक म्हणून काम पाहिलं आहे. सध्या सोशल मीडियावर मलायका अरोराचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती jigle jigle ट्रेंडवर डान्स करताना दिसत आहे. मलायकाचा हा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे. खासकरून तिच्या डान्स मूव्ह्सचं कौतुक केलं जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मलायका सिल्व्हर कलरच्या शिमरी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या टीममधील सहकाऱ्यांसोबत ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. मलायकाच्या या व्हिडीओवर दीड लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. याशिवाय या व्हिडीओवर युजर्सच्या कमेंटचा पाऊस पडताना दिसत आहे. एका युजरनं तर अभिनेत्रीची तुलना किम कर्दाशियनशी केली आहे.

आणखी वाचा- “तुम्ही माझ्यासाठी गायलेली गाणी…”; केके यांच्या आठवणीत इमरान हाश्मी झाला भावूक

अलिकडेच मलायका अरोरा करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मलायका अरोरा दिसली होती. त्यावेळचा तिचा लुक सोशल मीडियावर बराच चर्चेत राहिला होता. या पार्टीमध्ये तिचा बोल्ड आणि हॉट लुक पाहायला मिळाला होता. याशिवाय त्याआधी तिचा रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्येही मलायकाची हजेरी विशेष चर्चेत राहिली होती.

आणखी वाचा- Video : कधी घाम पुसताना तर कधी पाणी पिताना दिसला ‘केके’, असे होते अखेरचे काही क्षण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मलायका अरोरा तिच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा तिचे योगा आणि जीम वर्कआउटचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. याशिवाय मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. ती मागच्या काही वर्षांपासून अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघांमध्येही वयाचं अंतर जास्त असल्याने त्यांना सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं. मागच्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुनच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.