सध्या बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत चर्चेत आहे. ती काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नकाब’ या सीरिजमध्ये दिसली होती. या वेब सीरिजमध्ये तिने अभिनेत्री ईशा गुप्तासोबत इंटिमेट सीन दिला होता. एका मुलाखतीमध्ये तिला या सीन विषयी विचारण्यात आले होते. त्यावर तिने एका महिलेसोबत असा सीन शूट करणे आव्हानात्मक होते असे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ख्वाहिश’ या चित्रपटात मल्लिकाने १७ किसिंग सीन्स दिले होते. पण ‘नकाब’ या सीरिजमध्ये एका महिला अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन देणं हे फार कठीण असल्याचे मल्लिकाने सांगितले. मल्लिकाने नुकताच ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, ‘एका महिलेसोबत इंटिमेट होणं खूप कठीण होते. तुलनेने पुरुषासोबत इंटिमेट सीन देणे सोपे असते.’

आणखी वाचा : सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाजने केली चित्रीकरणास सुरुवात? निर्माते म्हणाले..

२००३मध्ये ख्वाहिश या चित्रपटातून मल्लिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने १७ किसिंग सीन्स दिले. त्यानंतर तिने ‘मर्डर’ आणि इतर काही चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स दिले. या सीन्समुळे तिच्यावर टीकादेखील झाली होती. पण मल्लिकाने याकडे दुर्लक्ष केले.

‘नकाब’ ही वेब सीरिज २६ वर्षांच्या अभिनेत्रीवर आधारित आहे. या अभिनेत्रीच्या आत्महत्याने नंतर संपूर्ण देशात खळबळ उडली. पोलीस देखील तिच्या आत्महत्येचे कारण शोधत असतात. या सीरिजमध्ये मल्लिकाने जोहरा मेहराची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallika sherawat on her intimate scene with esha gupta in web series nakaab avb
First published on: 23-09-2021 at 11:17 IST