प्रसिद्ध मणिपुरी गायक सुरेन युमनामचं निधन झालंय. सुरेनने उपचारादरम्यान रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तो ३५ वर्षांचा होता. मागच्या काही काळापासून तो यकृताच्या आजाराशी झुंज देत होता. सुरेन उपचार सुरू असतानाही खचला नव्हता, तो नेहमीच सकारात्मक असायचा. सुरेनच्या निधनानंतर त्याचा रुग्णालयातील एक व्हिडीओ गायक कैलाश खेर यांनी शेअर केला व त्याला श्रद्धांजली वाहिली.

कैलाश खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरेन हॉस्पिटलच्या बेडवर दिसतोय. त्याच्या सभोवताली उपचारासाठी वापरण्यात येणारे मशिन्स दिसत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही तो कैलाश खेर यांचे ‘अल्लाह के बंदे’ हे गाणं दमदार आवाजात गाताना दिसत आहे.

“मणिपूरचा लाडका आणि प्रख्यात गायक सुरेन यमनाम यांनी उपचारादरम्यान हॉस्पिटलच्या बेडवर “अल्लाह के बंदे” गाताना अखेरचा श्वास घेतला. तो आम्हा सर्वांना हसतमुखाने जगण्याचा संदेश देत निघून गेला. हा व्हिडीओ पाहिला, त्याचं गाणं ऐकलं आणि तो आणखी एक दिवस जगण्याची वाट कशी पाहत आहे, हे कळलं. मणिपूरच्या लोकांनी त्याच्या उपचारासाठी जमा केलेल्या रकमेबद्दल कळल्यावर आनंद झाला. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो. देव मणिपूरच्या लोकांचे भलं करो,” असं कैलाश खेर यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.

पाहा व्हिडीओ –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरेन यमनाम प्रसिद्ध मणिपुरी गायक होता. त्याने अनेक लोकप्रिय मणिपुरी गाणी गायली आहेत. त्याच्या गाण्यांना युट्यूबमध्ये लाखो व्ह्यूज असून त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.