scorecardresearch

‘परश्या’ने शेअर केलं लव्ह लेटर; अंकिता म्हणते, “प्रिय आकाश, जर माझ्याआधी तुला… I Love You”

सैराट फेम आकाश ठोसरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन या लव्ह लेटरचा फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलाय.

Akash Thosar Posted The Love Letter
इन्स्टाग्राम स्टोरीमधून त्याने हे लव्ह लेटर शेअर केलेलं.

सोशल मीडिया हा एखाद्याचा बाजार उठवण्याची अगदी योग्य जागा असल्याचं नेटकरी अनेकदा व्हायरल ट्रेण्डसंदर्भात बोलताना म्हणतात. सोशल मीडियावर कधी, काय आणि कोणत्या कारणासाठी व्हायरल होईल हे सांगता येणं फारच कठीण आहे. अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या नावावरुन एखादी गोष्ट व्हायरल झाल्यानंतर त्याच नावाच्या व्यक्तींना टॅग करणं किंवा त्यांच्या ती गोष्ट लक्षात आणून देण्याचं काम नेटकरी अगदी आवडीने करतात.

अर्थात आता अनेकांची नावं सारखीच असल्याने अनेकदा गोंधळही उडतो आणि त्यातून होते घडते गंमत. अनेकदा तर चाहतेच सेलिब्रेटींना या अशा व्हायरल गोष्टींची माहिती देतात. खरं तर आपल्या आवडत्या कलाकाराचा याच्याशी काही संबंध आहे की नाही याची खात्री करु घ्यावी असा या मागील हेतू असतो. असंच काहीसं एका मराठमोळ्या अभिनेत्यासोबत घडलंय. सैराट फेम परश्या म्हणजेच अभिनेता आकाश ठोसरसोबत हा प्रकार घडलाय. त्यानेही सोशल मीडियावर एक लव्ह लेटर शेअर कर या नसत्या शंकांना पूर्णविराम दिलाय.

प्रकरण असं आहे की मागील काही आठवड्यांपासून सोशल नेटवर्किंगवर एक लव्ह लेटर तुफान व्हायरल होतं आहे. हे लव्ह लेटर ज्या व्यक्तीसाठी लिहिण्यात आलंय त्याचं नाव ‘आकाश’ असं आहे. “प्रिय आकाश, तू मला प्रपोज केला आणि तुला मी जे काही म्हटले, त्यासाठी सर्वात आधी सॉरी. नंतर मी विचार केला आणि माझं मन सांगत होतं तूच आहेस तो ज्याची मी वाट बघते. जर माझ्या आधी तुला कोण आवडत असेल, तर नाही म्हटलास तरी चालेल. तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल, तर हो म्हण. माझ हृदय तुला दिलंय, तुझं हृदय मला दे, प्रेम करते तुझ्यावर एवढे तरी समजून घे, तुझी अंकिता,” असा हताने लिहिलेला मजकूर या लव्ह लेटरवर आहे.

आता हे लेटर व्हायरल झाल्यानंतर आकाश ठोसरच्या काही चाहत्यांनी या पत्रामधील ‘आकाश’ हा आपलाच लाडका अभिनेता आकाश आहे असं वाटलं आणि त्यांनी लेटर आकाश ठोसरला पर्सनल मेसेजच्या माध्यमातून पाठवण्यास सुरुवात केली. अखेर अनेकांनी हा असा प्रकार केल्यामुळे आकाश ठोसरने थेट इन्स्टाग्राम स्टोरीवर हे लव्ह लेटर शेअर करत आपलं म्हणणं मांडलं. “अरे मित्रांनो तो आकाश मी नाहीय! सगळे मलाच पाठवतायेत,” असंही या स्टोरीमध्ये आकाशने इमोन्जीसहीत म्हटलं आहे.

सैराटमधील प्रशांत काळे या भूमिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेला परश्या म्हणजेच आकाश त्यानंतर ‘फ्रेण्डशिप अनलिमिटेड’, ‘लस्ट स्टोरीज’ आणि इतर काही चित्रपटांमध्येही झळकला आहे. मात्र त्याला परश्या म्हणून मिळालेली ओळख आजही कायम आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-10-2021 at 09:43 IST