मराठी अभिनेता अक्षय वाघमारे हा सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप यांसारख्या चित्रपटांतून अक्षय वाघमारेने स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली आहे. अभिनयाच्या जोरावर त्यानं प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं आहे. अक्षय वाघमारे हा गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. त्याला डेंग्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच अक्षयनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याच्या प्रकृतीविषयी अपडेट शेअर केली आहे.

अक्षय वाघमारे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतो. काही दिवसांपूर्वी अक्षयला डेंग्यू झाला होता. याबाबत अक्षयने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो एक रुग्णालयात असल्याचे दिसत आहे. यात त्याच्या हातावर बँडेड पट्ट्या पाहायला मिळत आहे. याला कॅप्शन देताना त्याने त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

अक्षय वाघमारेची इन्स्टाग्राम पोस्ट

“हॅलो, सर्व प्रथम तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा … फ्रेंड्स काही दिवसांपूर्वी मला डेंग्यू झाला होता आणि आता मात्र डेंग्यू मधून मुक्त झालो आहे , तब्येत एकदम छानपणे सुधारत आहे.”

“आपले प्रेम व आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू द्या…आणि काळजी घ्या आपली व आपल्या स्वकीयांची कारण कोणता ही आजार हा शेवटी त्रासदायकच …तेव्हा काळजी घेतलेली बरी … आपलाच – अक्षय वाघमारे, टॅग करा तुमच्या बेस्टीला… कारण आज मैत्री दिन आहे …”, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षय वाघमारेच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे. अभिनेता आदिश वैद्य याने यावर कमेंट करत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तर अभिनेत्री रिना मधुकर हिने त्यावर लवकर बरे हो, फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा अशी कमेंट केली आहे.