नामांकित रंगभूमी कलाकार, दिग्दर्शक आणि चित्रपट अभिनेते मकरंद देशपांडे हे नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर कायमच चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या आरआरआर चित्रपटातही त्यांनी उत्तम भूमिका साकारली होती. तसेच अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत द फेम गेम या वेबसीरिजमध्येही त्यांनी काम केले होते. गेल्या काही दिवसांपासून तो ‘बलात्कार प्लीज स्टॉप इट’ या नवीन नाटकामुळे चर्चेत आहे. हे नाटक बलात्काराबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करते.

नुकतंच नवभारत टाइम्सने मकरंद देशपांडे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या नाटकाबद्दल भाष्य केले. “जेव्हा कधीही मी बलात्काराची बातमी वाचतो, त्यावेळी माझे मन विचलित होते. निर्भयासारखी अमानुष बलात्कार प्रकरण ऐकल्यानंतर तर फार दु:ख झालं होते. फार संताप आला होता. एखाद्या स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू का मानले जाते? आपली आई ही देखील एक स्त्री आहे हे माहिती असते. तिला आपण देवीसमान मानतो, मग असे का?” असा संतप्त सवाल मकरंद देशपांडे यांनी विचारला.

“३० वर्षातून पहिल्यांदाच मी माझ्या बाबांना हॉटेलात घेऊन गेलो अन्…”, ‘जीव माझा गुंतला’ फेम मल्हारची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“बलात्कारासंबंधीचे कायदे कठोर झाले आहेत. त्यामुळे अनेक गुन्हेगार हे आणखी जास्त हिंस्त्र झाले आहेत. बलात्कारपीडित महिलेची हत्या करणे, त्यांना जाळणे इत्यादी घटना सर्रास होत आहेत. पण मुद्दा हा आहे की बलात्कार पीडितांची मानसिकता कशी संपवायची? बलात्काराबद्दल क्षुल्लक आणि घृणास्पद विचार नेमंका काय? तो कसा संपवायचा? असा प्रश्नही अनेकदा माझ्या मनात येतो” असेही ते म्हणाला.

Sarsenapati Hambirrao Box Office Collection : ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, तीन दिवसात कमावले इतके कोटी

“पण काही वर्षांपूर्वी मी मुंगी या चित्रपटाचे शूटींग करत होतो. तेव्हा त्या चित्रपटात मी बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराची भूमिका साकारत होतो. त्यावेळी काही लोक तिथे शूटिंग पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यातील काहीजण मला म्हणाले, ‘काय मग कसं चाललंय? तुम्हाला मजा येतेय ना? असा प्रश्न मला विचारले. त्यावेळी मला त्या प्रश्नाची फार किळस वाटली”, असेही त्यांनी म्हटले.