गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात जातीयवादावरुन राजकारण सुरु आहे. यावर अनेक नेते मंडळी व्यक्त होताना दिसत आहे. त्याबरोबर आता या मुद्द्यावर सिनेसृष्टीतील अनेक मंडळी त्यांचं मत मांडताना दिसत आहे. नुकतंच बिग बॉस या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल त्याने संतप्त होत भाष्य केले आहे.

छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या या कार्यक्रमाचे चौथे पर्व सुरु आहे. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून पराग कान्हेरेला ओळखले जाते. पराग हा ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. तो एक प्रसिद्ध शेफ आहे. परागने नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने महाराष्ट्रातील जातीयवादावर भाष्य केले आहे.

पराग कान्हेरेची फेसबुक पोस्ट

“हे खरोखर विचित्र आहे..
महाराष्ट्र सर्वात मोठ्या चक्रीवादळातून जात आहे.
ब्राह्मण विरुद्ध जे ब्राह्मण नाहीत..
मला माझे शाळेचे दिवस आठवतात, मी सौ विमलाबाई गरवारे हायस्कूलमध्ये होतो..
माझे जिगरी मित्र होते केतन माने, सतीश पवार, स्वानंद जोशी, संदीप टकले, विनोद परदेशी, किरण पाटील, उपेश सोनवणे, इशान साठे, शिरीष आपटे, सातव, गोखले, तिखे, शिंदे, गायकवाड,कार्तिक उपासनी, कार्तिक केंधे…. आणखी काही…
आम्ही एकमेकांना जाती/धर्म/आर्थिक स्थिती वगैरे बद्दल कधीच विचारले नव्हते… आम्ही एकमेकांसोबत टिफिन शेअर करायचो.. उष्ट खायचो.. आम्ही एकमेकांच्या पाण्याच्या बाटलीतून पाणी प्यायचो.. बहुतेक आम्ही सर्व शाळेत त्याच 2/3 मुलींच्या मागे जायचो (खरं तर संपूर्ण शाळेत फक्त 2/3 सुंदर मुली होत्या)
आता सगळे मोठे झालो आहोत..
आम्ही अजूनही भेटतो, जुन्या आठवणी जपतो, कधी कधी त्या आठवणींना उजाळा देत पार्टी करतो.. (पण त्या २/३ मुली आता कुठे आहेत माहीत नाही…. आमच्या बोलण्यात त्या नेहमी असतात)
पण आजही…. कोणीही एकमेकांना विचारत नाही की तुम्ही ब्राह्मण आहात की नाही..
आजही एकाच थाळीतून खातो… टिफिनची जागा चांगल्या जेवणाने घेतली…
आजही एकाच बाटलीतून पितो… (पाण्याची जागा बिअरने घेतली आहे)..
मरण्यापूर्वी मला एक दिवस पहायचा आहे, जेव्हा महाराष्ट्रात कोणीही जातीवादावर बोलणार नाही…
आणि त्यासाठी मला स्वतःपासून सुरुवात करू दे.
मी शपथ घेतो, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी कोणालाही विचारणार नाही की तो/ती ब्राह्मण आहे की नाही.. मी कधीही ब्राह्मण आणि इतरांमध्ये भेद करणार नाही.
बघा तुम्ही याच्याशी सहमत आहात का…. पटलं तर शेअर करा, पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं शिकवूया.
सदैव तुमचा – पराग कान्हेरे” असे त्याने यात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान परागच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. खरय अगदी, राजकारणी जातीयवादाच्या तव्यावर त्यांची पोळी भाजून घेतात आणि लोकं त्यांच्यासाठी एकमेकांची लाज काढतात, अशी कमेंट त्याच्या एका चाहत्याने केली आहे. तर एकाने सहमत पण याची सुरुवात शासनातर्फ़े शाळेतील दाखल्यापासुन झाली तर येणाऱ्या पिढीसाठी खुप उत्तम असेल हे, असे म्हटले आहे. सध्या त्याची ही पोस्ट व्हायरल होत आहे.