scorecardresearch

“…तरीपण तुमची डिग्री पाण्यात जाणार” प्रसाद ओकने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत आहे.

“…तरीपण तुमची डिग्री पाण्यात जाणार” प्रसाद ओकने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
फोटो सौजन्य : लोकसत्ता

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक एक उत्तम अभिनेता दिग्दर्शक आहेच तसेच तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. प्रसाद त्याच्या कामाबाबतची माहिती अनेकदा शेअर करताना दिसतो. पत्नी व कुटुंबियांबरोबरचे फोटोही प्रसाद शेअर करत असतो.

प्रसादने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो की तुम्ही किती ही शिकला असाल चौथी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप, दहावी बोर्ड, १२ बोर्ड अमुक डिग्री तमुक डिग्री पण तरी जेव्हा एक वाक्य कानावर पडत ना? मागून आवाज येतो तुम्हाला काही कशातलं काही कळत नाही पुढे प्रसाद म्हणतो सगळ्या डिग्र्या पाण्यात गेल्या आहेत. प्रसादचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘RRR’ चं हॉलिवुड दिग्दर्शक जेम्स कॅमेरूनने कौतुक केल्यावर आलिया भट्टची पोस्ट चर्चेत; म्हणाली…

‘पटतंय की नाही?’ असं कॅप्शन देत प्रसादने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहले आहे खूप खोल विषय आहे तर दुसऱ्याने लिहले आहे एकदम बरोबर प्रसाद सर तर आणखीन एकाने लिहले आहे एकदम खरं आहे दादा, अशा शब्दात चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

प्रसाद ओकने आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत आहे. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातील प्रसाद ओकची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 18:46 IST

संबंधित बातम्या