टाईमपास चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकलेला दगडू अर्थात प्रथमेश परब पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाला आहे. ‘उर्फी’, ‘टाइमपास २’, ‘लालबागची राणी’, ‘३५% काठावर पास’ अशा चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाची चुणूक दाखविणारा प्रथमेश लवकरच ‘टल्ली’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

‘टल्ली’ या चित्रपटाचं टाइटल पोस्टर प्रदर्शित झालं असून प्रथमेशने इन्स्टाग्रामवर हे पोस्टर शेअर केलं आहे. झेब्रा एन्टरटेन्मेंटअंतर्गत निर्मिती करण्यात येणाऱ्या या चित्रपटामध्ये प्रथमेश मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रथमेश परबने आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे आगामी चित्रपटामध्ये तो कोणत्या रुपात दिसणार याकडे साऱ्याचं लक्ष वेधलं आहे. त्यातच चित्रपटाच्या नावावरुन या चित्रपटावरुन हा विनोदी आणि धम्माल करणारा चित्रपट असल्याचा एकंदरीत अंदाज वर्तविण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझ्या आजवरच्या विनोदी भूमिकांना आणि चित्रपटांना महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. टल्ली चित्रपच जरी विनोदी असला, तरीही या चित्रपटात विनोदाला समाज प्रबोधनाची झालर आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच माझी ओळख करून देताना नावाअगोदर ‘in & as’ प्रथमेश परब असे दिसेल. कोणत्याही अभिनेत्याच्या कारकिर्दीत अशी ओळख होणे, ही मानाची गोष्ट असते. या चित्रपटात माझा लूकही वेगळा असणार आहे. चित्रपटासाठी माझं फिजीकल ट्रेनिंगही लवकरच सुरू होईल,” असं प्रथमेशने सांगितलं.