सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सर्वच पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. मागच्या काही दिवसांपासून मराठी कलाकार महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करताना दिसत आहेत. ज्यात आता अभिनेता संदीप पाठक याचीही भर पडली आहे. संदीप पाठकनं महाराष्ट्रातील राजकारण आणि राजकीय नेते यांच्याबाबत केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे.

संदीप पाठकनं त्याच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून नुकतंच एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, ‘सर्व राजकीय नेते आपआपसात भांडत आहेत. परंतु एकही पक्ष किंवा एकही नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल एक चकार शब्द बोलत नाही. महागाई, वीजटंचाई, पाणी समस्या…’ संदीप पाठकचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर बरंच व्हायरल झालेलं पाहायला मिळत आहे.

आपल्या ट्वीटमधून संदीप पाठकनं महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या समस्यांकडे राजकीय नेत्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करून आपली मतं व्यक्त केली आहेत. ‘हेच तर राजकारण असतं’ अशाप्रकारच्या कमेंट अनेक युजर्सनी केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या महाराष्ट्रात महागाईचा मुद्दा सर्वाधिक चर्चेत आहे. याच मुद्द्यावरून आजकाल महाराष्ट्रील राजकीय नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशात आता अभिनेता संदीप पाठकचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे.