मराठी मालिका, चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून संतोष जुवेकरला ओळखले जाते. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ यासारख्या मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली. संतोष जुवेकरचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. नुकतंच संतोष जुवेकरने श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.
“गोव्याला गेलो तरी २० ते २५ हजार खर्च होतात मग…”, संतोष जुवेकरने चाहत्यांना केलं दत्तक पालक होण्याचे आवाहन

संतोष जुवेकरने मालिका, चित्रपट, नाटक या सर्व प्लॅटफॉर्मवर आपली जादू दाखवली आहे. संतोष सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. नुकतंच संतोष जुवेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने दहीहंडी पथकाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते दहीहंडी पथक कशाप्रकारे दहीहंडी निमित्त सराव करत आहे हे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला त्याने हटके कॅप्शनही दिले आहे.

संतोष जुवेकरची इन्स्टाग्राम पोस्ट

२ दिवसांवर गोपाळ अष्टमी आलीये. गेली दोन वर्ष हा गोपाळ काला उत्सव साजरा करता नाही आला कारण covid च संकट तीव्र प्रमाणात होत पण ह्या वर्षी ह्या उत्सवाचा जोर आणि जोश काही औरच असणार आहे सगळेच गोपाळ आणि गोपिका दही हंडी फोडण्याची जोरात तयारी करतायत कस्सून सराव चालाय.

कालच माझे खूप जवळचे मित्र श्री मनोज चव्हाण दादानं मुळे महाराष्ट्रातल गाजलेल्या जय जवान गोविंदा पथक जोगेश्वरी (मुंबई ) ह्यांची practic बघण्याची संधी मिळाली क्या बात मित्रांनो आणि मैत्रिणींनो जोमात अहात सगळे तुम्ही. एक क्षण वाटलं आपण पण घुसावं पण इतकं सोप्प नाही ते लगेच जाणवलं.

माझ्या तुम्हाला आणि सगळ्या गोविंदा पाथकांना खूप खूप शुभेच्छा आणि एक विनंती, मित्रांनो कृपया करून स्वतःची आणि तुमच्या सोबत येणाऱ्या मुलींची आणि लहान मुलांची काळजी घ्या दही हंडी हा सण आहे आपला तो सणा सारखाच साजरा करा त्याची स्पर्धा करू नका. जोश असुदे पण सोबतीला होशही असूदेत. बाकी आपले महाराष्ट्र पोलीस आहेतच आपल्या मदतीला आणि आवलीगीरी करणार्यांना फटके द्यायला. मज्जा करा आणि काळजी घ्या रे, असे संतोष जुवेकरने म्हटले आहे.

“पश्या मला तुला कडकडून मिठी मारायची आहे…”, ‘धर्मवीर’ चित्रपट पाहिल्यानंतर संतोष जुवेकरची आई भावूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान संतोषचा ‘हिडन’ चित्रपट हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात संतोष जुवेकरने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ या मराठी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली.