सिद्धार्थ चांदेकर हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. सिद्धार्थ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची माहिती इन्स्टाग्रामवर शेअर करीत, तो आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करतो. अलीकडेच सिद्धार्थ पत्नी मितालीसह स्पेन, फ्रान्स फिरून आला असून, या ट्रिपचे अनेक फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. दोघांच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा भरभरून वर्षावर केला होता. अशातच आता सिद्धार्थने शेअर केलेल्या आणखी एका पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा : नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीने ‘मिस्ट्री मॅन’बरोबर शेअर केला रोमॅंटिक व्हिडीओ; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, “मग नाटकं करायची…”

siddharth chandekar shares post for chinmay mandlekar
“जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत…”, सिद्धार्थ चांदेकर ट्रोलर्सवर संतापला; चिन्मय मांडलेकरला केली विनंती
How Sugar Can Harm Liver
तुम्ही खाल्लेली साखर, फळे, हवाबंद पदार्थ यकृतावर कसा परिणाम करतात? डॉक्टरांनी सांगितलं, ‘साखरेच्या कराचं’ महत्त्व
vijay kelkar
अग्रलेख: कराग्रे वसते लक्ष्मी..
Kiran Rao First Time Speaks About Divorce With Amir Khan
किरण रावने पहिल्यांदाच सांगितली आमिर खानसह घटस्फोट घेतानाची मनस्थिती; म्हणाली, “लग्नसंस्थेचे नियम..”

सिद्धार्थ चांदेकरने त्याने लिहिलेले स्फुटलेखन इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थ म्हणतो, “गम्मत बघा ना…धावाधाव, मरमर, चिडचिड, तणतण, रडरड हे सगळे दोनदोन वेळा वापरलेले शब्द आपण अनुभवतो ते शांतता हा एक शब्द अनुभवण्यासाठी.” या पोस्टला सिद्धार्थने “असंच वाटलं, स्फुटलेखन” असे कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा : विकी-साराची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली; ‘जरा हटके जरा बचके’चित्रपटाने दोन दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

सिद्धार्थने शेअर केलेल्या या स्फुटलेखनाचे त्याच्या चाहत्यांसह सिनेसृष्टीतील कलाकारांनीही कौतुक केले आहे. एका युजरने “जे तुला वाटलं ते अगदी योग्य आहे” अशी कमेंट केली आहे, तर दुसऱ्या एका युजरने कमेंटमध्ये “खूप छान सुविचार आहे सिद्धार्थ” असे म्हटले आहे. लेखक क्षितिज पटवर्धनने अभिनेत्याच्या पोस्टवर “बरं बरं बरं बरं….” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, सिद्धार्थ चांदेकर लवकरच ‘झिम्मा २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात सिद्धार्थसह सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे, अनंत जोग, चैत्राली गुप्ते या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.