‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर २ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईंकांच्या उपस्थितीत अक्षया-हार्दिकचं लग्न थाटामाटात पार पडलं. दोघांच्या लग्नाचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हार्दिक अक्षयाचे मनोरंजन क्षेत्रात मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्या विवाह सोहळ्याला ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील योगेश शिरसाट या अभिनेत्याने हजेरी लावली होती. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘असाच एकमेकांत जीव रंगू दे’ असा कॅप्शन त्याने दिला आहे. योगेशच्या बरोबरीने शिवानी बावकर, धनश्री कडगावकर या अभिनेत्रींनीदेखील हजेरी लावली होती.

Photos : जांभळ्या रंगात राणादा-पाठकबाईंचा राजेशाही थाट; अक्षया-हार्दिकच्या रिसेप्शनचे खास फोटो पाहिलेत का?

पुण्यात पारंपारिक पद्धतीने ते दोघेही विवाहबंधनात अडकले. हार्दिक अक्षयाने अतिशय पारंपारिक पद्धतीचा लूक लग्नाच्या विधींसाठी केला होता. यावेळी ते दोघेही फार आनंदात होते. मेहंदी, हळद असे कार्यक्रम साजरे केले गेले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत दोघांनी एकत्र काम केले होते. या मालिकेला प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेत हार्दिक जोशीने राणादा ही भूमिका साकारली होती.तर अक्षया देवधर ही या मालिकेत पाठकबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळाली. आता चाहते पुन्हा एकदा या जोडीला एकत्र पाहण्यासाठी आतुर आहेत.