चिन्मय मांडलेकर लिखित–दिग्दर्शित ‘गालिब’ हे नवंकोरं मराठी नाटक आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अष्टविनायक प्रकाशित, मल्हार+वज्रेश्वरी निर्मित या नाटकात ‘माझा होशील ना’ मालिकेतील लोकप्रिय जोडी सई व आदित्य म्हणजेच गौतमी देशपांडे व विराजस कुलकर्णी पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या नाटकाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. ‘गालिब’ नाटकानिमित्ताने गौतमी देशपांडेने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी संवाद साधला. यावेळी तिने नाटकातल्या भूमिकेपासून ते चिन्मय मांडेलकर यांच्या दिग्दर्शनाखाली काम करतानाचा अनुभव सांगितला.

हेही वाचा – अक्षरा-अधिपतीच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीत काय घडणार?, पाहा प्रोमो

अभिनेत्री गौतमी देशपांडे म्हणाली, “मी पुन्हा विराजसबरोबर काम करेल याची मला कल्पनाही नव्हती. असं योगायोगाने एकत्र काम करण्याची पुन्हा संधी येईल, असं वाटलंही नव्हतं. पण झालं. ‘गालिब’ या नाटकात माझी मध्यवर्ती भूमिका आहे. यामध्ये खूप वर्ष एका घरात तिच्या वडिलांची काळजी घेत राहिलेली मुलगी आहे. म्हणजेच जगाशी नाळ तुटलेली मुलगी, असं आपण म्हणू शकतो. त्या मुलीचा आतील आणि समाजातील झगडा यामधली कुटुंबाची ती कहाणी आहे. अत्यंत द्विधा मनस्थितीत असलेली ही मुलगी आहे. एका क्षणाला एक वाटू शकत तर दुसऱ्या क्षणाला वेगळंच वाटू शकत. आता हसतेय तर थोड्या वेळात रडू शकते. ‘इला’ असं या मुलीचं नाव आहे. त्या ‘इला’ची आणि तिच्या कुटुंबाची ही गोष्ट आहे. कौटुंबिक विषयावर आधारलेलं हे नाटक आहे. नाटकाचं नाव ‘गालिब’ असलं तरी गालिब ही भूमिका नसून रुपक आहे.”

हेही वाचा – आलिया भट्ट-रणबीर कपूर लेकीचा चेहरा का दाखवत नाहीत? अभिनेत्रीने सांगितलं केव्हा दाखवणार राहाची पहिली झलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे चिन्मय मांडलेकर यांच्या दिग्दर्शनाखाली काम करतानाचा अनुभव सांगत गौतमी म्हणाली, “कमाल अनुभव आहे. अजून काय वाटू शकत. एवढा प्रचंड अनुभव असलेला माणसाच्या हाताखाली जेव्हा तुम्ही काम करता. विशेषतः चिन्मय दादा याच्याविषयी म्हणणे की, समोरच्या व्यक्तीला ओळखून त्याच्याकडून काम काढून घेतो. म्हणजे त्या व्यक्तीच्या सकारात्मक बाजू, नकारात्मक बाजू जाणून घेतो. जी कमकुवत बाजू आहे, त्यावर ती व्यक्ती कशी मात करेल याच्याकडे त्याचं प्रचंड लक्ष असतं. एक अभिनेत्री म्हणून नाटककार होण्यामध्ये ‘गालिब’ या नाटकाचा प्रचंड मोठा हातभार आणि वाटा आहे.”