सध्या एकाच चर्चा आहे ती श्रद्धा वालकरच्या मृत्यची, मूळची वसईची असलेली श्रद्धा प्रियकर आफताब पूनावालाबरोबर आधी नायगाव येथे राहत होते मात्र नंतर ते दिल्लीमध्ये स्थायिक झाले. दिल्लीला गेल्यावर श्रद्धाने त्याच्यामागे लग्नाचा तगादा लावला. या मुद्द्यावरुन त्यांच्यामध्ये वाद झाला. भांडणादरम्यान आफताबने गळा आवळून तिचा खून केला. या प्रकरणावर सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहेत. सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटी यावर व्यक्त होत आहेत. अभिनेत्री केतकी चितळेनंतर आता गायिका अभिनेत्री केतकी माटेगावकरने पोस्ट शेअर केली आहे.
आपल्या सुमधूर सुरांनी तरुणाईला मोहून टाकणाऱ्या गायकांपैकी आघाडीचं नाव म्हणजे केतकी माटेगावकर. ती सोशल मीडियावरदेखील चर्चेत असते. तिने श्रद्धा प्रकरणावर भाष्य केलं आहे, ‘एक सुंदर असं जग आपले आई बाबा आपल्याला देतात. सुखसोयींनी, आणि उत्तम सुरक्षित असं, हे सगळे आपण बघू शकतो कारण वाईट गोष्टी आपले पालक आपल्या जगापर्यंत पोहचू देत नाहीत. एक चुकीचा निर्णय मात्र आपले आयुष्य बदलू शकतो. श्रद्धा एक सुंदर तरुण मुलगी तिचं काय चुकलं? ती प्रेमात पडली, मात्र चुकीच्या व्यक्तीवर तिने चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला. काल ही बातमी वाचून माझी झोप उडाली.’ अशा शब्दात तिने पुढे बरंच काही आपल्या मनातले व्यक्त केले.
-
ketki mategaonkar
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
प्रियकर आफताब पूनावालाने प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले. तब्बल सहा महिन्यांनी हा गुन्हा उघडकीस आल्याने पुरावे गोळा करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने गुन्हा कबूल केला आहे. या घटनेचा सर्वजण निषेध करत आहेत.