मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने तिच्या अभिनयाने आणि सौदर्यांनी अनेक प्रेक्षकांनी मनं जिकली आहेत. मराठी मालिका तसेच चित्रपटातून मृण्मयीने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मृण्मयीच्या पावलांवर पावलं ठेवतं तिची बहिणी गौतमी देशपांडेने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेतून गौतमीने मालिका विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘माझा होशील ना’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. मृण्मयीप्रमाणेच गौतमीने देखील चाहत्यांची पसंती मिळवली आहे. मृण्मयी आणि गौतमी दोघी बहिणींमध्ये त्यांच्या नात्यापलीकडची मैत्री पाहायला मिळते. त्या दोघी अनेकदा सोशल मीडियावर एकत्रित व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात.

नुकतंच मृण्मयीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मृण्मयी पाहायला मिळत आहे. यात मृण्मयीने ती फार कंटाळा आल्यानंतर काय करते? याबद्दल सांगितले आहे. या व्हिडीओत मृण्मयीही गौतमीला मारताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने फार हटके कॅप्शन दिले आहे.

“तुम्ही ज्या सईवर ही प्रेम करता ती चोर आहे”… कपडे लपवल्याने गौतमीवर बहीण मृण्मयी देशपांडे चिडली

मृण्यमी देशपांडेची इन्स्टाग्राम पोस्ट

“मायबाप प्रेक्षक, आणि समस्त मोठी भावंड यांच्या आग्रहाला मान देऊन, हा व्हिडिओ सर्व मोठ्या भावंडांना समर्पित करत आहे… सध्या पाऊस जोरदार असल्यामुळे घरी जास्त वेळ काढावा लागतो… आपला वेळ आपण असा मार्गी लावू शकतो… आपल्या आयांना बाहेर ठेऊन हे करता आलं तर लहानांना जास्त मारता येईल!! आणि आपल्याला जास्त मजा येईल…”, असे मृण्मयीने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे.

मलायका अरोराला आहे ‘या’ गोष्टीची सवय, बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृण्मयीच्या या व्हिडीओवर अनेक मराठी कलाकारांनी आणि तिच्या मैत्र-मैत्रिणींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नुकतंच यावर अभिनेत्री सोनाली खरे हिने हाहाहा वेडी अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेक कलाकारांनी यावर हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.