अभिनेत्री मुक्ता बर्वे ही लोकप्रिय मराठी अभिनेत्रींपैकी एक आहे. गेली अनेकवर्ष ती मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. नाटक, मालिका, चित्रपट असा माध्यमांमधून तिने काम केले आहे. तिच्या अभिनयनाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यावरून तिने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मुक्त बर्वे सोशल मीडियावर सक्रीय असते. ती स्वतःचे फोटो शेअर करत असते. तसेच आपल्या कामाबद्दलदेखील माहिती देत असते. नुकताच तिने मुंबईत बेस्ट बसने प्रवास केला आहे. त्याबद्दलची पोस्ट तिने शेअर केली आहे. बेस्ट बसमधला फोटो शेअर करत म्हणाली “जेव्हा रिक्षा टॅक्सी असे काहीच नसते तेव्हा बेस्ट ही बेस्ट,” असा कॅप्शन तिने दिला आहे. नेटकऱ्यांनी यावर कमेंट करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे “एकदम खरं आहे,” दुसऱ्याने लिहले आहे “अभिनेत्रीचे पाय अजून जमिनीवर आहेत.” अशा शब्दात तिचे कौतुक केले आहे.

“तुझ्या चित्रपटाच्या सेटवर येईन पण…” शाहरुख खानने आर्यनसमोर ठेवली ‘ही’ अट

आज मोठया शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी अनेकदा टॅक्सी रिक्षा हा पर्याय वापरला जातो. मात्र कित्येकदा हे चालक भाडे नाकारत त्यामुळे अनेकांची गैरसोय होते तसेच मुंबईत बेस्ट सेवा अनेकवर्ष आहे. आजही कित्येक जण या सेवेचा लाभ घेतात. आता सेलिब्रेटीदेखील सार्वजनिक वाहनातून प्रवास करू लागले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुक्त मूळची पुण्याची असून सध्या ती ‘चारचौघी’ या नाटकात काम करत आहे. नुकताच तिचा ‘आपडी थापडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मुक्ताने आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत.