मराठी-हिंदी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नेहा जोशीला ओळखले जाते. नुकतंच नेहा जोशी ही विवाहबंधनात अडकली आहे. नेहा जोशीने नुकतंच लगीनगाठ बांधली आहे. याचे तिने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र तिने कोणताही गाजावाजा न करता लग्न केले आहे.

नेहा जोशी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच नेहाने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहे. यातील एका फोटोत नेहाने ही मुंडावळ्या बांधल्या आहेत. यात ती अगदी नववधूच्या वेशात पाहायला मिळत आहे. “माझ्या आयुष्यातील नवीन भूमिका”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

तसेच दुसऱ्या फोटोत नेहा ही तिच्या नवऱ्यासोबत पाहायला मिळत आहे. यात तिने मुंडावळ्या बांधल्या असून हातात हिरवा चुडाही घातला आहे. नेहाच्या पतीचे नाव ओमकार कुलकर्णी असे आहे. यात तिच्या पतीनेही मुंडावळ्या बांधल्या आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिने ‘अखेर लग्नबंधनात अडकली’, असे म्हटले आहे.

नेहाच्या लग्नाचे सुदंर फोटोही आता समोर आले आहे. या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी यावर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेहाने आतापर्यंत अनेक मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटात भूमिका साकारली आहे. ‘वाडा चिरेबंदी’, ‘बेचकी’, ‘कनुप्रिया’ या नाटकात तिने फार उल्लेखनीय काम केले आहे. त्यासोबतच ‘झेंडा’, ‘पोश्टर बॉइज’, ‘लालबागची राणी’, ‘बघतोस काय मुजरा कर,’ अशा चित्रपटातही ती झळकली होती.