“हे वर्ष भारतीय स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष आहे. अमृत महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधत यापुढे महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता वंदे मातरम् म्‍हणत संभाषणाला सुरुवात करतील,” अशी घोषणा राज्‍याचे नवे सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. अभिनेत्री प्राजक्ता माळीने सुधीर मुनगंटीवार यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

आणखी वाचा – “चित्रपटावर बहिष्कार टाकू नका कारण…” ‘लाल सिंग चड्ढा’ला थंड प्रतिसाद मिळताच करीना कपूरचं प्रेक्षकांना आवाहन

प्राजक्ताने स्वातंत्र्यदिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या घराच्या खिडकीमध्ये तिने तिरंगा फडकावला आहे. त्याचा फोटो पोस्ट करत प्राजक्ताने म्हटलं की, “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. स्वातंत्र्यदिन चिरायू होवो. माझ्या प्रिय भारताचं स्वातंत्र्य, ऐक्य, सहिष्णूता, संस्कृती, सर्व धर्म समभाव विचार, महानता, परंपरा जगाच्या अंतापर्यंत अबाधित राहो. ह्या कामी माझं आयूष्य खर्ची पडावं. ह्या कामी सर्व देशवासीयांनी झटावं.”

पुढे म्हणाली, “आणि हो आजपासून फोनवर हॅलो बंद वंदेमातरम् सुरु. देव देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती. ही भावना कधीही मरू नये हीच प्रार्थना.” प्राजक्ताने याबरोबरच अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता देखील शेअर केली आहे.

आणखी वाचा – आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’चे शो रद्द, जबरदस्त प्रमोशन, अधिक मेहनत करूनही सुपरफ्लॉप ठरला चित्रपट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राजक्ताच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, खूप छान विचार व्यक्त केले अशा अनेक कमेंट तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत. अनेक कलाकार मंडळी देखील तिरंग्याचे फोटो शेअर करत स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत.