मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. त्यासोबतच प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते. काही दिवसांपूर्वी प्राजक्ता माळीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याचे काही फोटो आणि व्हिडीओ तिने शेअर केले आहेत.

प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटोही पोस्ट केले आहेत. त्यात तिचे काही सिनेसृष्टीतील मित्र तिची आरती करताना, केक कापून वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. याला प्राजक्ताने एक हटके कॅप्शनही दिले आहे.

“माझं ब्रेकअप झालं होतं अन् त्यावेळी…”, प्राजक्ता माळीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा

“माझ्या वाढदिवसानिमित्त मी कुटुंब, विस्तारित कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवला. मित्रांनी मेणबत्या न लावण्याचा आणि औक्षण करण्याचा हट्ट धरला, मलाही तो आवडला. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा रूपात खूप प्रेम मिळालं. कृतज्ञ, खूप धन्यवाद असेच आशिर्वाद पाठीशी राहू द्यात.

जास्तीत जास्त कॅाल्स , मेसेजेस् ना उत्तरं द्यायचा, सोशल मीडिया टॅग्सना उत्तर द्यायचा प्रयत्न केला. तरी जे नजरचुकीनं राहीले त्यांनी माफी द्यावी व लोभ कायम ठेवावा. तुम्हां सगळ्यांच्या प्रेमाची परतफेड चांगल्या कामाने करण्याचा प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र”, असे तिने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे.

“तू ज्या कलाकृतीत असते ती हिट का होते?” प्राजक्ता माळी म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राजक्ता ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपासून ती रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत आली होती. यानंतर ती कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित वाय चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची आहे. तर या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ आणि संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत.