मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने मराठी चित्रपट, मालिका, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे. शिवाय ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमासाठी करत असलेलं सुत्रसंचालनही प्रेक्षकांना खूप आवडतं. अभिनय, नृत्य, कविता यानंतर प्राजक्ताने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. नुकताच तिने स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरु केला आहे.

प्राजक्ताने याबाबत तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तिने याबद्दलची माहिती दिली होती, मात्र अद्याप ब्रँडचे नाव सांगितले नव्हते. आज दिनांक ६ जानेवारी रोजी तिने आपल्या ‘प्राजक्तराज’ या ज्वेलरी ब्रँडचे उदघाटन केले. विशेष म्हणेज मनसेप्रमुख राज ठाकरे या सोहळयाला उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राजक्ता मूळची पुण्याची असून आता करियरसाठी ती मुंबईत स्थायिक झाली आहे. अभिनयाच्याबरोबरीने प्राजक्ता एक उत्तम नृत्यांगणा व लेखिकाही आहे. प्राजक्ताचं ‘प्राजक्तप्रभा’ हे पुस्तकही प्रकाशित झालं आहे. प्राजक्ताचे आज सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत.