scorecardresearch

“शेवंता सारखं कॅरेक्टर मला करायला मिळालं हे माझं भाग्य…”, प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

त्यासोबत तिने संपूर्ण चित्रपटाच्या टीमचेही कौतुक केले आहे.

radha sagar
radha sagar

‘आई कुठे काय करते’ आणि ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राधा सागर सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. राधा ही नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राधाने अभिनेत्री अमृता खानविलकरची मैत्रीण शेवंता हिची भूमिका साकारली आहे. नुकतंच राधाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने चित्रपटातील कलाकारांचं कौतुक केलं आहे.

राधा सागर ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. तिने चंद्रमुखी चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने अमृतासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत तिने संपूर्ण चित्रपटाच्या टीमचेही कौतुक केले आहे.

“आता ओळख दाखवायलाही येऊ नकोस”, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्रावर संतापल्या हृता दुर्गुळेच्या सासू

“शेवंता” सारखं कॅरेक्टर मला करायला मिळाले हे मी माझं भाग्य समजते, “अमृता” बद्दल काय बोलू? ती खूप कमाल आहे ऍक्टर म्हणून आणि व्यक्ती म्हणून सुद्धा,सेटवर ती सर्वांशी मिळून मिसळून रहायची. सो मला त्या निमित्ताने एक खूप चांगली मैत्रीण “चंद्रा” च्या रुपात भेटली असं म्हणता येईल. “अमृता” जी काय या फिल्म मध्ये दिसलीय, खूप अप्रतिम. ही गोष्ट,चंद्रा च कॅरेक्टर, “आदिनाथ” चे कॅरेक्टर, सगळ्यांचे अभिनय,कास्टिंग,सगळंच कसं परफेक्ट होतं. आणि आमची भट्टी पण छान जमून आली.

सगळ्यांच्या कॉस्च्युम चे श्रेय मला असं वाटतं “मंजू ताई” कडे जातं. “अजय अतुल” सारखे दिग्गज संगीतकार आणि प्लॅनेट मराठी सारखा तगडा ओ टी टी प्लॅटफॉर्म हे याचे आधारस्तंभ होते.या प्रोजेक्ट ला चार चांद लावले ते म्हणजे “प्रसाददा” आणि “संजय सर.”फिल्म बघताना प्रत्येक फ्रेम काहीतरी मनात घर करून जाते. आणि “प्रसाददा” म्हणजे खरंच खूप टॅलेंटेड सेन्सिबल आणि समोरच्या कडून खूप उत्तम पद्धतीने नॅचरली काम काढून घेण्याची शैली अवगत असलेला असा उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक आहे असं मला वाटतं. सगळ्यांना फिल्म खूप चांगली ब्लॉकबस्टर हिट झाली यासाठी शुभेच्छा. अमू तुझ्या सोबत काम करून खूप छान वाटलं”., अशी पोस्ट राधा सागरने शेअर केली आहे.

Video : ‘चंद्रमुखी’च्या यशानंतर अमृता खानविलकर तुळजाभवानीच्या चरणी, म्हणाली “प्रमोशनच्या गडबडीत…”

दरम्यान ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२१ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटाच्या यशातील एक महत्वाचा चित्रपट ठरला. जागतिक पातळीवरही हा चित्रपट सुपरहिट ठरल्याचे पाहायला मिळाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress radha sagar share instagram post for amruta khanvilkar chandramukhi movie nrp

ताज्या बातम्या