मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे काही चित्रपट आहेत ज्यांनी चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटविली आहे. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे ‘सैराट’. या चित्रपटाची क्रेझ बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्येही पाहायला मिळाली. या चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू ही नावारुपाला आली. ‘मराठीत सांगितलेलं कळत न्हाय..इंग्रजीत सांगू’ असे म्हणत रिंकूने अनेकांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अभिनयाने आणि सौंदर्याने घायाळ करणारी आर्ची अर्थात रिंकू लहानपणी कशी दिसत असेल असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. मात्र रिंकू जशी आता सुंदर आहे तशीच ती लहानपणीदेखील तितकीच सुंदर होती.
रिंकू आता सोशल मीडियावर अॅक्टीव्ह झाली असून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती तिचे अनेक फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोंमध्ये तिने तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने रिंकूने आई-वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये रिंकू प्रचंड गोड दिसत आहे.
दरम्यान, रिंकूने शेअर केलेला हा फोटो चाहत्यांना कमालीचा आवडला असून त्यावर लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे रिंकूने काही काळापूर्वीच तिचं इन्स्टा अकाऊंट सुरु केलं आहे. मात्र कमी कालावधीमध्ये तिचे 129K इतके फॉलोअर्स झाले आहेत.
