मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ अशी ओळख असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या चित्रपटातून, फोटोशूटमधून चर्चेत असते. गेली अनेकवर्ष ती चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. तीच खासगी आयुष्यदेखील चर्चेत असतं. कुणाल बेनोडेकरशी तिने आपली लग्नगाठ बांधली आहे. सध्या ती आणि तिचे कुटुंबिय पंजाबमध्ये येथे गेले आहेत. सध्या तिचा एका व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सोनालीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती आपल्या नवऱ्याबरोबर शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. ‘घर की खेती.. गहू’ असं तिने कॅप्शनमध्ये लिहलं आहे. तसेच तिने लिहले आहे की तिच्या नवऱ्याला त्यांचे शेत बघण्याची इच्छा होती. त्यामुळे आम्ही याचा आनंद घेत आहोत. अशा शब्दात तिने आपल्या भावनाव्यक्त केल्या आहेत. व्हिडीओमध्ये ती ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. त्यांचे शेत ती पाहत आहे.

Photos : सोनाली कुलकर्णी कुटुंबियांबरोबर पोहचली वाघा बॉर्डरवर; म्हणाली, “खरी देशभक्ती…”

सोनाली सध्या पंजाबमध्ये आहे. तिने नुकतीच वाघा बॉर्डरला भेट दिली आहे तसलेच तिकडेच फोटो शेअर केले आहेत. सोनाली मराठी चित्रपटांमध्ये सक्रीय आहे तर तिचा नवरा कुणाल बेनोडेकर हा दुबईत स्थायिक असतो. नुकताच त्यांचा विवाहसोहळा लंडन येथे थाटामाटात पार पडला. त्याआधी त्यांनी दुबईत साखरपुडा पार पडला होता.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनाली मूळची पुण्याची असून तिची आई पंजाबी असून वडील लष्करात होते. ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. तिने काही हिंदी चित्रपटदेखील केले आहेत.