Aarti Solanki : दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट नुकताच १८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती ए.ए. फिल्म्स या नामांकित वितरण संस्थेने केली आहे. या चित्रपटात संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे पाहायला मिळत असून संत मुक्ताईची भूमिका अभिनेत्री नेहा नाईकने साकारली आहे. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

अनेक प्रेक्षक व कलाकार मंडळी या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत या चित्रपटाविषयी अभिप्राय देत आहेत. अशातच एका मराठी अभिनेत्रीने या चित्रपटाविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे आरती सोळंकी. अनेक विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ‘बिग बॉस मराठी’ फेम आरती सोळंकीने ‘मुक्ताई’बद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री आरती सोळंकीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने असं म्हटलं आहे की, “महाराष्ट्रामध्ये गावोगावी बाया नाचवण्यापेक्षा ‘मुक्ताई’ हा सिनेमा दाखवावा. ही समस्त मंडळांना विनंती”. आरतीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने शेअर केलेल्या या पोस्टमुळे अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आरती सोळंकी इन्स्टाग्राम पोस्ट

आरती सोळंकी सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तसंच आपल्या कामानिमित्तची माहितीही शेअर करत असते. ‘बिग बॉस मराठी’दरम्यान ती शो संबंधित तिची मतं शेअर करत होती. अशातच आता तिने ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’बद्दल पोस्ट शेअर केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आरती सोळंकीच्या कामाबद्दल सांगायचं तर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. याशिवाय तिने ‘४ इडियट’, ‘येड्यांची जत्रा’, ‘वाजलंच पाहिजे’ आणि ‘लूज कंट्रोल’ या चित्रपटांत काम केले आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतही ती दिसली होती. ती ‘ढोलकीच्या तालावर’ या शोमध्येही पाहायला मिळाली होती.