दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे सध्या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारखे त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडले. आता प्रवीण यांचा ‘बलोच’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी प्रवीण यांनी त्यांच्या चित्रपटाविषयी सांगितलं. शिवाय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरविषयी एक आठवण सांगितली.

प्रवीण यांनी सचिनवर असलेल्या प्रेमापोटी बारावीचा बोर्डाचा पेपरच दिला नाही. त्यामुळे त्यांचं एक वर्ष असंच गेलं. याचविषयी प्रवीण म्हणाले, “सचिन तेंडुलकरचा मी खूप मोठा फॅन आहे. माझी बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू असताना सचिनची मॅच होती. सचिनची मॅच होती म्हणून मी बोर्डाचा पेपरच दिला नाही. कारण माझं एक म्हणणं होतं की, मी सचिनची बॅटिंग पाहिली नाही तर तो लवकर आऊट होतो आणि आपण मॅच हारतो”.

आणखी वाचा – Video : फेसाळलेला समुद्र, हातात हात अन्…; प्रभाकर मोरे पत्नीसह समुद्रकिनारी, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “मोरेंची शालू”

“बोर्डाच्या परीक्षेसाठी मी गेलो. पेपर हातात घेतला. त्यावेळी बोर्डाच्या पेपरला किमान अर्धा तास तरी विद्यार्थ्याने बसलं पाहिजे असा नियम होता. मी पेपर देण्यासाठी अर्धा तासच बसलो आणि बाहेर निघून आलो. एक वर्ष माझं असंच गेलं. पण त्याच्या पुढच्या वर्षी मी चांगल्या मार्काने पास झालो. पण तुम्ही असा वेडेपणा करू नका. मी बारावीचा एक पेपर दिला नाही. पण त्यानंतर मी एम कॉम (M.Com), एमबीए, एलएलबीपर्यंत शिक्षण घेतलं. या सगळ्या परीक्षांमध्ये मी टॉप होतो”.

आणखी वाचा – “वडिलांचे पैसे उडवतो आणि…” सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मिळाली वाईट वागणूक, म्हणाला, “माझ्या तोंडावर…”

“अभिनयक्षेत्रातही तुम्ही टॉप आहात” असं कोणीतरी या कार्यक्रमात गर्दीतून म्हटल्यावर प्रवीण तरडे म्हणाले, “ते होणारच ना… कारण परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच चिकट. मी सचिनच्या प्रेमापोटी बारावीचा एक पेपर दिला नाही. पण कोणीही असं काही करू नका”. प्रवीण उच्चशिक्षितही आहेत हेही त्यांनी यावेळी सांगितलं.