मराठीसह बॉलिवूडमध्येही अभिनेता म्हणून आपलं स्थान बळकट करणारा कलाकार म्हणजे शरद केळकर. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘हर हर महादेव’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये त्याने साकारलेली ऐतिहासिक भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. इतकंच नव्हे तर त्याच्या भारदस्त आवाजाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कौतुक केलं. आपल्या कामामुळे चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्याच्या भावूक पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये मुलाबरोबरच महेश मांजरेकरांनी लेकीलाही दिली काम करण्याची संधी, लूक समोर

salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

शरदला कोणत्याही विषयांवर व्यक्त होणं आवडत नाही. एखादा वाद चर्चेत असताना त्यामध्येही बोलणं तो टाळतो. पण सोशल मीडियाद्वारे तो आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतो. तसेच या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतो. त्याचं पाळीव प्राण्यांवरही प्रचंड प्रेम आहे. याबाबतच त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

शरदचा लाडका श्वान बकार्डीचं निधन झालं आहे. त्याच्या निधनानंतर तो अगदी भावुक झाला. बकार्डीबरोबर त्याचं खास नातं होतं. आपल्या लाडक्या श्वानाबरोबरचे फोटो व व्हिडीओ तो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतो. आता त्याच्या निधनानंतर त्याने पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं.

आणखी वाचा – Inside Photos : कधीकाळी अगदी लहान घरामध्ये राहणाऱ्या आदेश बांदेकर यांचं आलिशान घर आहे फारच सुंदर, पाहा फोटो

शरद म्हणाला, “तुझी नेहमीच आठवण येईल. बकार्डी भावपूर्ण श्रद्धांजली.” शरदने याबरोबर त्याच्या लाडक्या श्वानाबरोबरचा फोटोही शेअर केला आहे. त्याने ही पोस्ट शेअर करताच सेलिब्रिटी मंडळींनीही बकार्डीला श्रद्धांजली वाहिली आहे.