सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दिग्दर्शक केदार शिंदेंचा ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतंच अभिनेत्री अमृता खानविलकरने तिला हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल पोस्ट केली आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात शाहीरांची भूमिका अंकुश चौधरीने साकारली आहे. तर या चित्रपटात सना शिंदे ही शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारताना दिसत आहे. अमृता खानविलकरने नुकतंच या चित्रपटातील काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट पाहिल्यानंतर प्राजक्ता माळीची पोस्ट, म्हणाली “नसेल पाहिला तर…”

अमृता खानविलकरची पोस्ट

“आजच्या दिवशी जर आपल्या जन्म भूमीला …. कर्म भूमीला तुम्हाला बहुमान द्याचा असेल तर फक्त महाराष्ट्र शाहीर अनुभवून बघा. प्रेक्षक म्हणून हा चित्रपट बघताना डोळे भरून येतात … अंगावर रोमांच उभे राहतात …. उर अभिमानाने भरून येतो.

उत्तम दिग्दर्शन …. छायाचित्रण …. अभिनयाने …. नटलेला हा चित्रपट तुम्ही बघायलाच पाहिजे. केदार शिंदे अप्रतिम स्टोरी टेलिंग आणि दिग्दर्शन अंकुश चौधरी कुठेच दिसत नाही… फक्त आणि फक्त शाहीर साबळे

सना शिंदेचे डोळे… तिची सरलता… तिची स्थिरता खूपच जीवघेणी आहे आणि अजय-अतुल ह्यांच्या संगीता बद्दल जितकं बोलावं तितकं कमी …. गाऊ नको किसना म्हणजे कमाल…. पाऊल थकलं नाही. अजय सर काय ओ बोलावं … नतमस्तक, चित्रपट नक्की बघा, जय जय महाराष्ट्र माझा”, असे अमृता खानविलकरने म्हटले आहे.

आणखी वाचा : “हा माझा पहिला चित्रपट आणि तिचा प्रतिसाद…” सना शिंदेच्या पोस्टने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात सना शिंदे, अभिनेत्री अश्विनी महांगडे, निर्मिती सावंत यांसह अनेक कलाकार हे महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. शुक्रवारी २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.