अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ओंकार भोजनेचा सरला एक कोटी हा चित्रपट काही नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे. या चित्रपटातील केवडयाचं पान तू या गाण्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गाण्यातील रोमँटिक सीनवरुन अनेक चर्चा रंगताना दिसत आहे. नुकतंच ईशा केसकरचा बॉयफ्रेंड ऋषी सक्सेना याने याबद्दल भाष्य केले आहे.

सरला एक कोटी या चित्रपटात अभिनेत्री ईशा केसकर मुख्य भूमिकेत झळकत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर आणि गाणी सध्या सुपरहिट ठरताना दिसत आहे. या चित्रपटातील केवडयाचं पान तू या गाण्यात ओंकार आणि ईशा केसकरचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. या गाण्यातील रोमँटिक सीनवरुन सातत्याने चर्चा रंगत आहे. नुकतंच याबद्दल ऋषी सक्सेनाने प्रतिक्रिया दिली. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितले.
आणखी वाचा : “आम्ही एकमेकांचे हात धरले अन्…” ओंकार भोजनेबरोबरच्या ‘त्या’ रोमँटिक सीनबद्दल ईशा केसकर स्पष्टच बोलली

“मी ते गाणं आणि ट्रेलर पाहिला. मला तो फारच आवडला. खरं सांगायचं तर मला ईशा आवडली. पण ओंकारला बघण्यासाठी मला पुन्हा ते पाहावं लागेल. ती फार चांगली दिसत आहे. तिला मोठ्या पडद्यावर पाहताना मी फक्त हसतमुखाने त्याकडे पाहत होतो”, असे ऋषी सक्सेना म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by ईशा केसकर (@ishagramss)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण यांची निर्मित “सरला एक कोटी’’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी केले आहे. तर विनोद नाईक कार्यकारी निर्माते आहेत. हा चित्रपट गेल्या २० जानेवारी २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.