अभिनेत्री क्रांती रेडकरनं आपल्या अभिनयानं मनोरंजनसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘जत्रा’, ‘खो-खो’, ‘शिक्षणाच्या आईचा घो’, ‘तीन बायका फजिती ऐका’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटातून तिनं काम केलं आहे. क्रांती एक उत्कृष्ट अभिनेत्री असली तरी ती जबरदस्त नृत्यही करते. तसेच तिनं काही वर्षांपूर्वी दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं. अशा या सर्वगुण संपन्न असलेल्या अभिनेत्रीचं नाव क्रांती का ठेवलं? याचा खुलासा तिनं नुकत्याच एका मुलाखतीतून केला आहे.

हेही वाचा – २००४नंतर पहिल्यांदाच अभिनेत्री सोनाली बेंद्रेला भेटल्यानंतर केदार शिंदेंची होती ‘ही’ रिअ‍ॅक्शन; म्हणाले, “मोठेपणा…”

क्रांती ही सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी ती दिग्दर्शन क्षेत्रात सक्रिय आहे. शिवाय ती सोशल मीडियावरही अधिक सक्रिय असते. नेहमी तिचे अनुभव सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तसेच तिच्या दोन जुळ्या गोंडस मुलींचे व्हिडीओ सुद्धा ती शेअर करत असते. त्यामुळे क्रांती नेहमी चर्चेत असते. नुकतीच क्रांतीनं पती समीर वानखेडेंबरोबर पहिल्यांदाच अभिनेत्री अमृता राव आणि तिचा पती आरजे अनमोल यांच्या ‘कपल ऑफ थिंग्ज’ या युट्यूब चॅनेलवर मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्रीनं आपलं नाव क्रांती का ठेवलं? याबाबत सांगितलं.

हेही वाचा – ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ मालिकेनं प्रेक्षकांचा घेतला निरोप; नेटकरी म्हणाले, “फार दुःख…”

हेही वाचा – “…याचं शल्य मनात नक्कीच आहे”; केदार शिंदेंच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाले, “सैराट….”

क्रांती म्हणाली की, “माझा जन्म १५ ऑगस्टला होणार होता. त्यामुळे माझ्या बाबांनी माझं नाव क्रांती ठेवायचं, हे ठरवलंच होतं. पण मी उशीरा जन्माला आले. १७ ऑगस्टला माझा जन्म झाला.”

हेही वाचा – “…म्हणून मी आनंद दिघेंची भूमिका साकारली नाही”; मंगेश देसाईंनी कारण केलं स्पष्ट, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, क्रांतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम करत आहे. तसेच क्रांतीनं दिग्दर्शित केलेला ‘रेनबो’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यापूर्वी क्रांतीनं ‘काकण’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.