Mansai Naik Shares Post On Fathers Day : आज ‘जागतिक फादर्स डे’ आहे. भारतात दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ‘फादर्स डे’ साजरा केला जातो. यंदा २०२५ मध्ये १५ जून रोजी तो साजरा केला जात आहे.

हा दिवस म्हणजे मुलांसाठी त्यांच्या वडिलांबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी आहे. त्यानिमित्त अनेक जणांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक हिने वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

मानसी नाईकने तिच्या वडिलांबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावरून शेअर केला आहे. आज जागतिक फादर्स डेच्या निमित्ताने तिने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिची आईदेखील आहे. मानसीने शेअर केलेला हा फोटो तिच्या लहानपणीचा आहे.

मानसीने या फोटोला सुंदर असे कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं, “बाबा, फादर्स डेच्या शुभेच्छा. वडिलांचे अश्रू आणि भीती अदृश्य असतात. त्यांचे प्रेम अव्यक्त असते. पण, त्यांची काळजी आणि संरक्षण आयुष्यभर आपल्यासाठी बाळाचा आधारस्तंभ म्हणून राहते. एक वडील तुम्हाला सांगत नाहीत की ते तुमच्यावर प्रेम करतात, ते तुम्हाला दाखवतात.”

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. तिने ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यातून घराघरात ओळख मिळवली. त्यानंतर मानसी काही चित्रपटांमध्येही दिसली. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच आपल्या ग्लॅमरस अंदाजाने आणि सोशल मीडियावरील अ‍ॅक्टिव्हिटीमुळे चर्चेत असते.

मानसी नाईक ही एक लोकप्रिय अभिनेत्री, नृत्यांगना आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. अभिनयाबरोबरच ती उत्तम नृत्यकलेसाठी ओळखली जाते. मानसीने ‘मर्डर मेस्त्री’, ‘झाला बोभाटा’, ‘डीएनए’, ‘हळद रूचकर’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मानसीचा नृत्यातील सहज व आकर्षक अंदाज प्रेक्षकांना खूप आवडतो. तिचे अनेक लावणी स्टाईलमधले परफॉर्मन्स विशेष गाजले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.