...म्हणून प्राजक्ता माळी रेड कार्पेटवर साडी नेसून करते एण्ट्री, स्वतःच केला खुलासा | actress prajakta mali talk about why she wear saree for award function red carpet see details | Loksatta

…म्हणून प्राजक्ता माळी रेड कार्पेटवर साडी नेसून करते एण्ट्री, स्वतःच केला खुलासा

प्राजक्ता माळी रेड कार्पेटसाठी साडीच का परिधान करते? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा

prajakta mali prajakta mali photos
प्राजक्ता माळी रेड कार्पेटसाठी साडीच का परिधान करते? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने मराठी चित्रपट, मालिका, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे. शिवाय ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमासाठी करत असलेलं सुत्रसंचालनही प्रेक्षकांना खूप आवडतं. प्राजक्ताला पारंपरिक लूकमध्ये पाहणं तिच्या चाहत्यांना खूप आवडतं.

आणखी वाचा – “एक चट्टान, सौ शैतान” अंगावर काटा आणणारा अजय देवगणच्या ‘भोला’चा टीझर प्रदर्शित; तुम्ही पाहिलात का?

बऱ्याचदा प्राजक्ता साडी परिधान करत सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसते. तिचा साडीमधील लूक विशेष लक्षवेधी ठरतो. आता प्राजक्ताने पुरस्कार सोहळ्यांसाठीही ती साडी परिधान का करते? हे सांगितलं आहे. शिवाय साडी परिधान करणं हे प्राजक्तालाही आवडतं. याबाबत तिने स्वतःच सांगितलं आहे.

झी टॉकीजच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्याला प्राजक्ताने हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवरही तिने साडी परिधान करुन एण्ट्री केली. तर काही मराठमोळ्या अभिनेत्री अगदी बोल्ड लूकमध्ये दिसल्या. यावेळी ती साडी परिधान करणं का पसतं करते? याबाबत तिने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

आणखी वाचा – आधी ओलीचिंब भिजत वनिता खरातने नवऱ्याला केलं किस, आता मिठी मारत शेअर केला रोमँटिक फोटो, म्हणाली…

प्राजक्ता म्हणाली, “आतापर्यंत मला असं वाटायचं की पुरस्कार सोहळ्यांसाठी फक्त गाऊन, वेस्टर्न ड्रेसच परिधान केले पाहिजे. कारण अशा कार्यक्रमांसाठी अभिनेत्रींनी अशाप्रकारचे कपडेच परिधान करणं अपेक्षित असतं. पण आता मला असं वाटतं की आपल्याला जे आवडतं आपण ज्यामध्ये भारी दिसतो तेच कपडे परिधान केले पाहिजे. म्हणून मी पुन्हा साडी नेसायला लागले.” यापुढेही प्राजक्ता रेड कार्पेटसाठी साडीच नेसणार असं दिसतंय.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 13:50 IST
Next Story
Video: ‘झिम्मा’च्या घवघवीत यशानंतर चित्रपटाचा दुसरा भाग ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, टीझर प्रदर्शित