“ऐका दाजीबा…” हे गाणं आजही महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय आहे. २००२ मध्ये प्रदर्शित झालेलं हे गाणं मराठीसह हिंदी कलाविश्वात तुफान गाजलं. आजही लग्नकार्यांमध्ये हे गाणं आवर्जून वाजवलं जातं. या गाण्यात मिलिंद गुणाजी व इशिता अरुण ही फ्रेश जोडी झळकली होती. नुकतीच या गाण्याला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने या गाण्याचे संगीतकार अवधूत गुप्तेनी कलाकारांसह खास रियुनियन केलं. हा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर चांगलाच चर्चेत आला आहे.

गाण्याला २१ वर्षे पूर्ण झाल्याने अवधूत गुप्ते, गायिका वैशाली सामंत, अभिनेता मिलिंद गुणाजी व अभिनेत्री इशिता अरुण यांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन “ऐका दाजीबा”वर भन्नाट डान्स केला आहे. यानिमित्ताने या संपूर्ण टीमचं तब्बल २१ वर्षांनी रियुनियन झालं.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने खरेदी केलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

मिलिंद गुणाजी यांचा रांगडेपणा आणि इशिताच्या चेहऱ्यावरील गोड हास्य यामुळे या जोडीने अनेकांची मनं जिंकली. मात्र ‘ऐका दाजीबा’नंतर ही जोडी परत एकत्र काही दिसली नाही. मिलिंद गुणाजी कलाविश्वात, तर इशिता सोशल मीडियावर सक्रिय असते. इशिता ही सुप्रसिद्ध अभिनेत्री, गायिका इला अरुण यांची लेक असून “ऐका दाजीबा…”मुळे ती प्रकाशझोतात आली होती.

२१ वर्षांनी पुन्हा एकदा या गाण्यावर थिरकताना अभिनेत्री लिहिते, “आमच्या गाण्याला २१ वर्षे केव्हा झाली समजलंच नाही. आम्ही सगळे पुन्हा भेटलो आणि आजही मला प्रत्येक डान्स स्टेप आठवत होती. हे गाणं माझ्यासाठी कायम खास असेल. संगीतकार अवधूत गुप्ते आणि मिलिंद गुणाजींबरोबर काम करून मजा आली अन् वैशाली तुझ्या आवाजाची जादू आजही कायम आहे.”

हेही वाचा : “कमी वयात सोडून गेली”, पूनम पांडेच्या पब्लिसिटी स्टंटपासून अजित पवार अनभिज्ञ, भर सभेत व्यक्त केलं दु:ख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वैशाली, अवधूत, इशिता व मिलिंद या चौघांनी मिळून पुन्हा एकदा ऐका दाजीबा गाण्यावरील डान्स रिक्रिएट केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला २४ तासांत २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.