scorecardresearch

“माझ्या अत्यंत…” अमिताभ बच्चन यांना मराठी चित्रपटाची भूरळ

या चित्रपटाचे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही कौतुक केले आहे.

“माझ्या अत्यंत…” अमिताभ बच्चन यांना मराठी चित्रपटाची भूरळ

अभिनेता श्रेयस तळपदेचा बहुचर्चित आपडी थापडी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा चित्रपट मनोरंजक असल्याचे कळत आहे. येत्या ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा सहकुटुंब आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. या चित्रपटाचे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही कौतुक केले आहे.

महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. अमिताभ बच्चन हे ट्वीटरवर कायमच सक्रीय असतात. त्यांनी नुकतंच आपडी थापडी या चित्रपटाचा ट्रेलर ट्वीटरवर शेअर केला आहे. त्यात त्यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी चक्क मराठीत ट्वीट केलं आहे.
आणखी वाचा : ‘केबीसी’च्या प्रत्येक भागासाठी बिग बी घेतात इतकं मानधन? कपड्यांवरही होतो लाखोंचा खर्च

“T 4429 – रोहन विनायक माझ्या या अत्यंत प्रिय मित्रांना, आणि अतिशय सक्षम संगीत दिग्दर्शकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा…”, असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले. हा चित्रपट ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : “तुमच्या घरची लक्ष्मी चालली सोडून…” श्रेयस तळपदेच्या बहुचर्चित ‘आपडी थापडी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या ‘आपडी थापडी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीला करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. या चित्रपटाचं संगीत आनंद भास्कर, हनीफ शेख आणि रोहन विनायक यांनी केलं आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांसह कलाकारांमध्येही मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या