झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नकारात्मक भूमिका साकारत आहेत. रुपाली राजाध्यक्ष हे त्यांचं मालिकेमधील पात्र प्रेक्षकांच्याही पसंतीस पडत आहे. दरम्यान ऐश्वर्या यांचा लग्नाचा वाढदिवस नुकताच पार पडला. त्यांचे पती अभिनेते अविनाश नारकर यांनी यावेळी आपल्या पत्नीसाठी खास पोस्ट शेअर केली.

आणखी वाचा – Video : राणादा-पाठकबाईंच्या घरी सत्यनारायणाची पूजा, नवविवाहित जोडप्याच्या साधेपणाची व्हिडीओमध्ये दिसली झलक

ऐश्वर्या यांच्याबरोबरच अविनाशही मराठी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत. मराठीमधील सुप्रसिद्ध जोडप्यांमध्ये ऐश्वर्या व अविनाश यांचं नाव आदराने घेतलं जातं. आता या दोघांच्या लग्नाला २७ वर्षं पूर्ण झाली आहेत.

याचनिमित्त ऐश्वर्या यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत अविनाश यांनी म्हटलं की, “बाप रे पल्लू. काल आपल्या संसाराला २७ वर्ष पूर्ण झाली. तुझ्या गोड सहवासात ही एवढी वर्ष कशी वाऱ्यासारखी भुर्रकन उडून गेली कळलंच नाही गं. तुला आभाळभर प्रेम माय लव्ह.”

आणखी वाचा – ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्रीची झाली सर्जरी, रुग्णालयातील फोटो शेअर करत मानले डॉक्टरांचे आभार; म्हणते “माझ्या नवऱ्यानेही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोघांना सेलिब्रिटींसह त्यांच्या चाहतेमंडळींनी लग्नाच्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये अविनाश मात्र थकलेले दिसत आहेत. पांढऱ्या रंगाचे केस, मिशीमध्ये त्यांचा लूकच बदलेला दिसत आहे. पण या पोस्टवरुनच त्यांचं त्यांच्या पत्नीवर असलेलं प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे.