गेल्या अनेक दिवसांपासून इन्स्टाग्राम, युट्यूब, फेसबुक उघडल्यावर एकच गाणं कानी पडत आहे ते म्हणजे ‘बहरला हा मधुमास’. या गाण्याने चाहत्यांना अगदी वेड लावलं आहे. ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावरील रील्सही प्रचंड व्हायरल होत आहेत. या गाण्याची हुक स्टेप प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे.

बहुचर्चित व बहुप्रतीक्षीत ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील हे गाणं आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत असणार आहे. महाराष्ट्राचे रत्न शाहीर साबळे यांच्या जीवनाचे व व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटात केदार शिंदेंची लेक सना शिंदेने शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे. शाहीर साबळे व भानुमती यांच्यातील प्रेमाची खास झलक या गाण्यातून दाखविण्यात आली आहे.

हेही वाचा>> केदार शिंदेंच्या लेकीने शेअर केला शाहीर साबळे यांच्याबरोबरचा बालपणीचा फोटो, दोघांमधील नेमकं नातं काय?

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं गुरू ठाकूर यांनी लिहिलं आहे. अजय-अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे तर प्रसिद्ध बॉलिवूड गायिका श्रेया घोषालने हे गाणं गायलं आहे. ‘बहरला हा मधुमास’ गाण्याचं नृत्य दिग्दर्शन कृति महेशने केलं आहे.

हेही वाचा>> सलमान खानचं टेन्शन वाढलं! ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशीच ऑनलाइन झाला लीक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अकुंश चौधरी व सना शिंदे मुख्य भूमिकेत असून अश्विनी महांगडे, मृण्मयी देशपांडे, अमित डोलावत, दुश्यंत वाघ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.