केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ३० जूनला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. ‘बाईपण भारी देवा’ला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे दिग्दर्शक केदार शिंदेंसह चित्रपटाच्या संपूर्ण टीमने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

हेही वाचा : “रोमान्स, फॅमिली ड्रामा अन् ब्रेकअप…”, रणवीर-आलियाच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

अभिनेत्री दीपा चौधरीने सिद्धिविनायक बाप्पाचा आशीर्वाद घेतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना दीपाने “गणपत्ती बाप्पा मोरया!” असे कॅप्शन दिले आहे. सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे, निर्माते निखिल साने सुद्धा उपस्थित होते. “आमच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे, आम्ही देवाचे आभार मानण्यासाठी आलो आहोत”, असे अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितले.

हेही वाचा : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने केले टक्कल, तिरुपती मंदिराजवळील नवा लुक पाहून चाहते हैराण

अभिनेत्री दीपा चौधरीने शेअर केलेल्या फोटोंवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने “‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचा पार्ट २ लवकरच येऊ दे…अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी करा, तुम्ही सर्वांनी खरंच खूप सुंदर काम केले आहे…खूप प्रेम” अशी कमेंट केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६.४५ कोटींचा गल्ला जमावला आहे. यासंदर्भात केदार शिंदेंनी पोस्ट शेअर करत सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा : “बिगबॉसचं घर लै रिस्की”, किरण मानेंनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले, “माझा गॉडफादर एकच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच याबरोबरच अभिनेते शरद पोंक्षे, पियुष रानडे यांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत.