केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या चित्रपटाने फक्त १७ दिवसांत ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी यांनी जया काकडे ही भूमिका साकारली आहे. तर त्यांच्या नवऱ्याचे म्हणजे अरुण देसाई या पात्राची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. नुकतंच केदार शिंदेंनी याचा एक किस्सा सांगितला आहे.

‘बाईपण भारी देवा’ च्या संपूर्ण टीमने नुकतंच चित्रपटाच्या यशाचे जंगी सेलिब्रेशन केले. यावेळी या चित्रपटातील सर्वच कलाकार उपस्थित होते. यादरम्यान केदार शिंदे यांनी अरुण देसाई म्हणजे सतीश जोशी यांचे कास्टिंग कसे झाले, याचा किस्सा सांगितला.
आणखी वाचा : “तिची मतं, कृती मला पटत नाही, पण…”, देवेंद्र फडणवीसांनी अमृता फडणवीसांबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाले “महिलांनी इतकी…”

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात माईंच्या नवऱ्याचे पात्र सतीश जोशी यांनी साकारले आहे. पण सतिश जोशी हे अभिनेते नाहीत. त्यांनी पहिल्यांदाच या चित्रपटात अभिनय केला आहे. विशेष म्हणजे त्यांना तो उत्तम जमला आहे, असेही केदार शिंदे म्हणाले.

आम्ही जेव्हा हा चित्रपट करण्याचे ठरवले, तेव्हा त्यासाठी कोणकोणती ठिकाणं घ्यायची, याचा शोध सुरु होता. मी आणि अजित भुरे वेगवेगळी ठिकाणं पाहत होतो. या चित्रपटात अरुण देसाई आणि जया देसाई यांचे जे घरं दिसतंय, त्याठिकाणी आम्ही पोहोचलो. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सतीश जोशी यांनी दार उघडलं. त्यांचा हसरा चेहरा केदार यांच्या मनात भरला. त्यानंतर त्यांनी अजित भुरे यांच्याकडे सतीश यांना अरुण देसाई या पात्रासाठी विचारायचं का? असे विचारले.

आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावेळी अजित यांनी ते कलाकार नाहीत. त्यांना अभिनयाचा काहीच अनुभव नाही. पण तरीही केदार शिंदे मात्र ठाम होते. केदार यांनी सतीश यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडला आणि त्यांनी लगेचच आपला होकार कळवला. विशेष म्हणजे रोहिणी हट्टंगडी यांच्या नवऱ्याचे अरुण देसाई हे पात्र अजित भुरे यांना साकारायचे होते. पण केदार शिंदेंनी सतीश यांची निवड केली. परंतु चित्रपटात सतीश यांच्या पात्राला व्हॉईस ओव्हर देण्याचे काम हे अजित भुरे यांनी केले आहे, असा खुलासा केदार शिंदे यांनी केला आहे.