Ankita Walawalkar Kunal Bhagat: ‘बिग बॉस मराठी’ फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर नुकतीच लग्न बंधनात अडकली. अंकिता व तिचा संगीत दिग्दर्शक पती कुणाल भगत सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. कुणालही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो त्याच्या कामाच्या अपडेट्स चाहत्यांना इन्स्टाग्रामवर देत असतो. तसेच अंकिताबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओही पोस्ट करत असतो.

कुणालने नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘विचारा’ असं म्हणत प्रश्नोत्तराचं एक सेशन ठेवलं होतं. त्याला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले होते आणि या प्रश्नांची उत्तरं त्याने दिली होती. यात त्याच्या चाहत्यांनी त्याला अंकिताबरोबरची लव्ह स्टोरी, बिग बॉस मराठी फेम धनंजय पोवारबरोबर काम केव्हा करणार यासह अनेक प्रश्न विचारले होते. एका चाहत्याने कुणालला त्याचं शिक्षण किती झालंय, हा प्रश्नही विचारल होता. त्याचं उत्तर कुणालने दिलं आहे.

‘दादा तुझं शिक्षण किती झालंय,’ असा प्रश्न एका चाहत्याने कुणाल भगतला (Kunal Bhagat Education) विचारला. कुणालने उत्तर देत ‘पेट्रोकेमिकलमध्ये बीई केलंय’ असं सांगितलं. मराठी मालिका व सिनेमांमध्ये संगीत देणारा कुणाला पेट्रोकेमिकल इंजिनिअर आहे.

पाहा पोस्ट

Kunal Bhagat Education
चाहत्याचा प्रश्न व कुणालने दिलेलं उत्तर

कुणाल भगत हा प्रसिद्ध मराठी संगीत दिग्दर्शक आहे. तो गायक व लेखकही आहे. कुणालने अनेक मराठी चित्रपट व मालिकांसाठी संगीत दिग्दर्शनाचं काम केलं आहे. कुणाल करण सावंतबरोबर मिळून काम करतो.

कुणालने ‘येक नंबर’ सिनेमाचं संगीत दिग्दर्शन केलं होतं. तसेच “तू चाल पुढं” या मालिकेच्या शीर्षक गीतासाठी कुणाल-करणला अवॉर्डही मिळाला होता. अंकिता व कुणाल या दोघांनी ‘आनंदवारी’ या गाण्यात एकत्र काम केलं होतं. त्यांचं हे गाणं चांगलंच गाजलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कुणाल व अंकिता यांनी लग्नानंतरचा त्यांचा पहिला होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. अंकिताने सासरच्या घरी माणगावला कुणालबरोबर पारंपरिक पद्धतीने होळीची पूजा केली. अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर होळी व धुळवड सेलिब्रेशनचे फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत.