महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची जोडी कायम चर्चेत असते. या दोघांकडे ‘पॉवर कपल’ म्हणून पाहिलं जातं. डिसेंबर २००५ मध्ये या दोघांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. अमृता फडणवीस या बँकर असण्याशिवाय गायिका म्हणून विशेष सक्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेतील अनेक गाणी गायली आहेत. अलीकडेच एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.

“तुम्ही दोघं एकत्र शेवटचा सिनेमा पाहायला केव्हा गेला होतात?” असा प्रश्न लोकमतच्या मुलाखतीत उपमुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझ्या लक्षात नाही आणि मला असं वाटतं तिच्याही लक्षात नसेल. कदाचित आम्ही घरी एखादा सिनेमा पाहिला असेल पण, त्याचीही शक्यता कमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही एकत्र चित्रपट पाहायला गेलेलो नाही. मला वेळच मिळत नाही.”

हेही वाचा : Video : ‘धर्मवीर’ फेम मंगेश देसाईंचा नव्या घरात गृहप्रवेश! मिसेस मुख्यमंत्र्यांसह श्रीकांत शिंदे यांची खास उपस्थिती

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “एकदम खरं सांगायचं झालं, तर मी २०१४ मध्ये मुख्यमंत्री झालो त्यानंतर आजपर्यंत मी चित्रपटगृहात फक्त दोन वेळाच गेलो आहे. एकदा टिळक सिनेमाचा प्रीमियर शो होता म्हणून गेलो होतो आणि आताच जो केरला स्टोरी चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपटगृहात जाण्याची माझी दुसरी वेळ होती. तेव्हा देखील मी प्रीमियर शोसाठी गेलो होतो. या व्यतिरिक्त जाणं झालं नाही.”

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यावर विवेक अग्निहोत्रींची होती ‘अशी’ प्रतिक्रिया; म्हणाले, “ऑस्कर, राष्ट्रीय पुरस्कार…”

View this post on Instagram

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही तिघं जेव्हा एकत्र असतो तेव्हा, आयपॅडवर आम्ही तिघं तीन वेगवेगळे सिनेमे पाहत असतो. मला त्यांच्याबरोबर एकत्र चित्रपट पाहायला फार आवडेल. पण, हे शक्य किती होईल याबद्दल मला काही माहिती नाही.” असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.